19.4 C
Latur
Thursday, December 12, 2024
Homeमहाराष्ट्रदेवेन्द्रजी २१०० रुपये जमा करा

देवेन्द्रजी २१०० रुपये जमा करा

फडणवीस मुख्यमंत्री होताच सुप्रिया सुळेंची मागणी

पुणे : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर काल १२ दिवसांनी सरकार स्थापन झाले. ५ डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानात महायुती सरकारचा शपथविधी झाला. महायुतीमध्ये भाजप मोठा भाऊ ठरल्यामुळे मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे गेले. आता खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की देवेंद्रजी म्हणाले होते की, लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून २१०० रुपये देणार आहोत. नवीन वर्ष सुरु होत आहे. डिसेंबर किंवा जानेवारी, डिसेंबर महिना सुरु झाला आहे पण शक्य असेल, तर डिसेंबरपासूनच किंवा १ जानेवारी २०२५ पासून लाडक्या बहिणीच्या खात्यात महिना २१०० रुपये जमा करा. आम्ही तर म्हणतो 3 हजार रुपये द्या, कारण आम्ही सत्तेवर आलो असतो, तर महिना ३ हजार रुपये देणार होतो असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

विधानसभा निवडणुकीत भाजपचे १३२ आमदार निवडून आले. त्यामुळे मुख्यमंत्रीपद भाजपला मिळाले. देवेंद्र फडणवीस यांनी काल महाराष्ट्र राज्याचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, तशी देवेंद्र फडणवीस यांची शपथ घेण्याची तिसरी वेळ आहे. २०१४ ते २०१९ पहिला कार्यकाळ होता. २०१९ साली फक्त ८० तास हा त्यांचा दुसरा कार्यकाळ राहिला. आता ५ डिसेंबरपासून त्यांचा तिसरा कार्यकाळ सुरु झाला आहे. त्यांच्यासोबत शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

सरकार स्थापन झाल्यानंतर ही योजना सुरु राहिल का? असा अनेकांच्या मनात प्रश्न आहे. महायुतीच्या नेत्यांनी या योजना सुरु राहतील असे वारंवार सांगितले आहे. महायुतीने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यातून महिन्याला १५०० ऐवजी २१०० रुपये जमा करण्याच आश्वासन दिले आहे. आज खासदार सुप्रिया सुळे यांनी महायुतीला त्याच आश्वासनाची आठवण करुन दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR