तुळजापूर : प्रतिनिधी
श्रीक्षेत्र तुळजापूर येथील श्री तुळजाभवानीचा भक्तगण देशभर आहे. विशेषत: महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, गुजरात या राज्यात भाविकांची संख्या मोठी आहे. नवसाला पावणारी देवी अशी तुळजाभवानीची ओळख आहे. बंगलोर येथील मयंक देशपांडे या भाविकाने तुळजाभवानी देवीस सोन्याचा टोप अर्पण केला आहे. त्याचे वजन १९०.३०० ग्रॅम आहे.
श्री तुळजाभवानी मातेस कर्नाटकातील बंगलोर येथील मयंक विलास देशपांडे या भाविकाने १९०.३०० ग्रँम वजनाचा सोन्याचा टोप खडामोतीसह अर्पण केला. यावेळी तुळजाभवानी मंदिर समितीच्या वतीने मयंक देशपांडे यांचा प्रशासकीय व्यवस्थापक सोमनाथ माळी यांनी देविजीची प्रतिमा भेट देवून सत्कार केला. यावेळी सिद्धेश्वर शिंदे, जनसंपर्क अधिकारी श्री. सातपुते, मयंक देशपांडे यांचे पुजारी विशाल सुनिल सोंजी उपस्थित होते.