सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने गेल्या तीन महीन्यात अवैध विनापरवाना मद्य पिण्यास परवानगी देणा-या १७ढाब्यांवर कारवाई करीत १७ ढाबा मालक व ४५ मद्यपी ग्राहकांना ४ लाख ६७हजारांचा दंड करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागावतीने केलेल्या धडक कारवाईमध्ये कालावधीमध्ये १ डिसेंबर ते २७ डिसेंबर २०२४ या कालावधीमध्ये सोलापूर शहर व जिल्ह्यात एकुण १८७ गुन्हे नोद करण्यात आले आहे. या कालावधीत २४ वाहनासह एकुण ७६ लाख ६६ हजार ३८ रुपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.
यामध्ये मातोश्री ढाबा, दुर्गा बाबा (होटगी रोड), जयभवानी ढाबा (मंगळवेढा रोड), सावजी कोड्रिंक्स (कन्ना चौक), तसेच पंढरपुर कासेगाव येथील साईराजे, महाराजा ढाबा (तारापूर ता. माढा) येथील राणा ढाबा, माळशिरस
येथील सावनी ढाबा, शिवनेरी (टाकळी सिकंदर ता. मोहोळ), हॉटेल सावली(भोगाव ता.उ. सोलापूर), शुभम ढाबा (सांगोला ता. सांगोला), राहुल गणपत जाधव याचे राहते घर (भाळवनी ता. पंढरपुर), श्रीराम कोल्ड्रिंक्स (जोडभावी पेठ सोलापूर), जय भवानी दाबा (बेलाटी ता.उ. सोलापूर), हॉटल अपुर्वा ढाबा (तुळजापुर रोड तळेहिप्परगा) या १७ डाव्यांवरती कारवाई करुन ब्रीथ अॅनलायझर चा वापर करून वैदयकीय चाचणी करण्यात आली.
त्यानंतर १७ढाबा मालक व ४५ मद्यपी ग्राहकांना न्यायालायासमोर हजर केले असता ढाबा मालकास प्रत्येकी २५ हजार रुपये व मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी तीन हजार रुपये इतक्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली असून एकुण ४ लाख ६७ हजार रुपये इतका दंड जमा करुन घेण्यात आला आहे.सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये ढाब्यांवर कारवाई यापुढेही अशीच चालू राहणार आहे. परवाना नसणाऱ्या ठिकाणी मदय प्राशन केल्याने संबंधित जागा म ह्यालक व मदयपी या दोघांवर कारवाई होऊ शकते याची नोंद संबंधितानी घ्यावी असे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने सांगण्यात आले.