26.5 C
Latur
Friday, March 14, 2025
Homeमहाराष्ट्रधनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण

धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण

तरुणाला अमानुषपणे मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

बीड : प्रतिनिधी
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणापासून बीड सातत्याने चर्चेत आहे, अशातच बीडमधील राजकीय नेत्यांच्या निकटवर्तीयांचे व्हायरल होत असलेले व्हीडीओ, ऑडिओ क्लीप यामुळे बीडमध्ये नेमके काय सुरू आहे, बीडचे बिहार होते आहे का, असा सवाल निर्माण झाला आहे. अशातच आता धनंजय देशमुख यांचे साडू दादा खिंडकर हे पोलिसांना शरण आले आहेत. खिंडकर हे एका व्यक्तीला मारहाण करीत असल्याचा व्हीडीओ बुधवारी व्हायरल झाला होता, त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. पिंपळनेर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

संतोष देशमुख यांच्या हत्येदरम्यानचे काही फोटो व्हायरल झाले. बीडमधील अनेक मारहाणीचे व्हीडीओ पुढे येत आहेत. टोळक्यांकडून एकाच मुलाला मारहाण केली जात होती. संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांचे साडू दादा खिंडकर याचा सुरुवातीला एक धक्कादायक व्हीडीओ पुढे आला. या व्हीडीओमध्ये दादा खिंडकर एका मुलाला क्रूरपणे मारहाण करताना दिसला.

दादा खिंडकरने स्पष्ट केले की, व्हायरल होणारा व्हीडीओ जुना आहे. या व्हायरल होणा-या व्हीडीओनंतर बीड पोलिस अ‍ॅक्शन मोडवर आले. दादा खिंडकरविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला. आता दादा खिंडकर पोलिसांना शरण आला असून फक्त एकच नाही तर दादा खिंडकरचे दोन व्हीडीओ व्हायरल झाले. दुस-या व्हीडीओमध्ये एका घरावर हल्ला करताना दादा खिंडकर दिसला. आता एसपी ऑफिसमध्ये दादा खिंडकरने आत्मसमर्पण केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR