22.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeनांदेडधनगर समाजाला एसटीचे आरक्षण द्यावे

धनगर समाजाला एसटीचे आरक्षण द्यावे

मुखेड : प्रतिनिधी
धनगर समाजाला आरक्षणाच्या सवलती लागू करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले होते त्या आश्वासनला आज ५० दिवस पुर्ण झाले परंतू शासनाने अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही त्यामुळे शासनाने धनगर समाजाला एस.टी.प्रवर्गात समावेश करुन आरक्षणाच्या सवलती लागू करण्याची मागणी समाजाने तहसिलदार राजेश जाधव यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी चोंडी येथे धनगर समाजाला एस.टी.चे आरक्षण लागू करावे या मागणीसाठी कार्यकर्त्यांनी आमरण उपोषण चालू केले होते. या आंदोलकांची भेट घेवून राजभवन मुंबई येथे समाजातील नेत्यांची बैठक घेण्यात आली होती त्या बैठकीत ५० दिवसात एस.टी.च्या सवलती लागू करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते मात्र या पैकी काहीच झाले नसल्याने आज तहसिलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविण्यात येवून ५० दिवसाची मुदत संपल्याची आठवण करुन देण्यात आली व समाजाच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

या निवेदनावर अ‍ॅड.शिवराज पाटील कुंद्राळकर, पत्रकार शिवाजी कोनापूरे, गजानन देवकत्ते, आर.डी.पाटील, हाणमंत पाटील नरोटे, उमेश पा.श्रीरामे, संगमेश्वर देवकत्ते, अ‍ॅड.नामदेव हाके, डॉ.सतिष धमणे, अ‍ॅड.योगेश सोलंकर, ज्ञानेश्वर श्रीरामे, खंडेराव श्रीरामे, शंतनू पाटील, अ‍ॅड.गजानन देवकत्ते, कपिल नाईक, अशोक नाईक उंद्रीकर, रामदास गोपनर, विलास पाटील ईमडे, पवन वरवटे, सदाशिव देवकत्ते, बालाजी देवकत्ते, तानाजी नाईक, ज्ञानेश्वर पोताने, बालाजी श्रीरामे, हाणमंत शेवाळे, बबलू देवकत्ते, मारोती सादगीर, सतिश श्रीरामे आदी कार्यकर्त्यांच्या स्वाक्ष-्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR