पुणे : शहरातील कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणात कारवाईचा बडगा उगारला जात आहे. या पार्श्वभूमीवर पब संस्कृतीचा पर्दाफाश करणा-या व सरकारला धारेवर धरणा-या आंदोलक आमदार रवींद्र धंगेकर व शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
कारण अंधारे व धंगेकर यांनी पुण्यातील एक्साईज कार्यालयात जाऊन पोलिसांवर गंभीर आरोप केले. त्यावेळी मंत्री शंभुराजे देसाई यांचेही नाव घेतले. त्यामुळे त्यांनी या दोघांनाही नोटीस बजावण्याचा इशारा दिला आहे.