धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक: महायुतीचे बसवराज पाटील यांचा विजय

धाराशिव (प्रतिनिधी) : धाराशिव, लातूर आणि बीड स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद पोटनिवडणुकीत महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील यांनी तब्बल ७१९ मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार महेश देशमुख यांचा दारुण पराभव केला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार महेश देशमुख यांना केवळ १२५ मते मिळाली, तर बसवराज पाटील यांनी तब्बल ८४४ मते घेत दणकेबाज विजय नोंदवला. विशेष म्हणजे, बसवराज पाटील यांनी राज्यात सर्वाधिक मते मिळवून विजयी होण्याचा मान पटकावला आहे.

मतांचे गणित आणि बंडखोरी
या निवडणुकीसाठी एकूण ९८८ मतदार होते, त्यापैकी ९८३ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. या निवडणुकीत महाविकास आघाडीची तब्बल १२५ मते फुटून ती महायुतीच्या पारड्यात गेल्याचे स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकत्र नसल्याचेच या निकालातून समोर आले असून, हा आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. दुसरीकडे, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे शिवसेनेत (उद्धव ठाकरे गट) जाणार या चर्चेमुळे त्यांच्या समर्थक मतदारांनी महायुतीला साथ दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या निवडणुकीत महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी बसवराज पाटील यांना भक्कम साथ दिल्याचे दिसून आले.

कार्यकर्त्यांचा जल्लोष
बसवराज पाटील यांच्या या विक्रमी विजयानंतर त्यांच्या समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी धाराशिवसह विविध ठिकाणी जोरदार आतषबाजी करत जल्लोष साजरा केला. बसवराज पाटील यांच्या विजयामुळे उमरगा तालुक्याला आता दोन आमदारांचे बळ मिळाल्याची भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
LIVE : एकमत कार्यालयातील गणपती बाप्पांची आरती | श्री गणेश आरती | Ekmat Digital
07:25
Video thumbnail
Nanded|ST आरक्षणासाठी बंजारा समाज आक्रमक! नांदेड-नागपूर महामार्गावर 2 तास रास्ता रोको
02:31
Video thumbnail
Latur|मसलग्यात बैलगाडी मोर्चा! शेतकऱ्यांचा महामार्गावर रस्ता रोको, सरकारला इशारा
02:17
Video thumbnail
Latur|देवणी पोलिसांच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली! शेतातून महाकाय मगर जेरबंद
00:36
Video thumbnail
Latur|एकमत कार्यालयात गणरायाची आरती; माऊली शिक्षण संस्थेचे गंगाधर आराडले यांची उपस्थिती
02:52
Video thumbnail
Latur|संजीव सोनवणे प्रकरणात मोठी अपडेट! सुसाईड नोटची होणार तपासणी | DYSP समीरसिंह साळवे
02:37
Video thumbnail
AUSA ANDOLAN |लातूरसह मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करा! औशात हजारो महिला रस्त्यावर
03:58
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये खळबळ! संजीव सोनवणे यांच्या मृत्यूप्रकरणी फॉरेन्सिक टीम घटनास्थळी
03:31
Video thumbnail
Latur|औशातून दुष्काळाचा एल्गार! तहसील कार्यालयासमोर संभाजी सेनेचे ठिय्या आंदोलन
05:55
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये खळबळ! प्रसिद्ध संस्थाचालक संजीव सोनवणे यांनी गोळी झाडून केली आत्महत्या...
01:01
Video thumbnail
Raj Thackeray LIVE| राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी गणरायाचा आगमन
23:24
Video thumbnail
Latur|लातूरमधून मुंबईकडे ८००-९०० वाहनं! मराठा आंदोलनाची जोरदार तयारी
04:58
Video thumbnail
Nanded Ganeshotsav 2026 |नांदेडमध्ये गणरायाचे उत्साहात आगमन! घरोघरी आणि मंडळांमध्ये बाप्पा विराजमान
02:42
Video thumbnail
Ganeshotsav 2026|लातूरमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला; बाप्पांच्या खरेदीसाठी गर्दीच गर्दी
03:25
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांचं आगमन | श्री गणेश आरती | Ekmat Digital
08:54

Latest news