28.4 C
Latur
Friday, May 9, 2025
Homeअंतरराष्ट्रीयदाऊद इब्राहिम पळाला?

दाऊद इब्राहिम पळाला?

इस्लामाबाद : पाकिस्तान विरोधात ऑपरेशन सिंदूर राबविताना १३ दहशतवादी स्थळांवर मंगळवारी मध्यरात्री जोरदार हल्ला चढविला. या एअर स्ट्राइकची सर्वांनाच जोरदार धडकी बसली आहे. आता अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची झोप उडाली आहे. त्याचमुळे त्यांनी भयभयीत होऊन संपूर्ण कुटुंबासह कराची शहर सोडून पलायन केल्याचे समजते.

पहलगाम येथील हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी मध्यरात्री भारताने १३ दहशतवादी स्थळांवर मंगळवारी मध्यरात्री जोरदार हल्ला चढविला. या मध्ये मोठया संख्येने दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे पुढे आले आहे. त्यानंतर गुरुवारी रात्री पाकिस्तानने भारतातील काही शहरावर ड्रोनने हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र भारताने त्यांची सर्वच ड्रोन हवेतच पाडली. त्यानंतर भारताने हवाई ड्रोन हल्ले केले. त्यामुळे पाकिस्तान चांगलाच बिथरला असल्याचे दिसत आहे.

भारतीय क्षेपणास्त्रांनी लाहोर, सियालकोट आणि कराचीसह पाकिस्तानमधील महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य केले. भारतीय लष्कराने अनेक लष्करी प्रतिष्ठानांवर हल्ला केला. त्यामुळे संपूर्ण पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. भारताने केलेल्या या कारवाईमुळे दाऊद इब्राहिम कराची सोडून पळून गेला आहे. दाऊद इब्राहिमसोबत त्याचे साथीदार अनीस आणि छोटा शकील यांनीही कराची सोडले आहे. त्यासोबतच कुटुंबाला घेऊन दाऊद कराची बाहेर पळाला असल्याची माहिती सूत्राने दिली.

दाऊद इब्राहिम आपल्या साथीदारांसह जीव वाचवण्यासाठी एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी गेला आहे. त्याने कराचीतून पळ काढला आहे. त्याला कराचीतून बाहेर काढण्या मागे आयएसआय असल्याचे म्हटले जात आहे. त्याला पाकिस्तानमध्येच दुस-या सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आल्याची माहितीही सुत्रांकडून मिळत आहे. दाऊदचा संपूर्ण परिवार या हल्ल्यामुळे घाबरला आहे. त्यात पत्नी महजबीन, मुलगा मोईन, त्याचा छोटा भाऊ अनिस इब्राहीम, दाऊदचा डावा हात छोटा शकील यांच्यासह त्याने कराची सोडली असल्याचे समजते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR