26.7 C
Latur
Friday, January 3, 2025
Homeमहाराष्ट्रपुरावे नष्ट केल्यावर वाल्मिक कराडने सरेंडर केले का?

पुरावे नष्ट केल्यावर वाल्मिक कराडने सरेंडर केले का?

मुंबई : सीआयडीला शरण जाण्यापूर्वी कराडने एक व्हीडीओ जारी केला आहे. यामध्ये त्याने केज पोलिस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झाल्याचा आरोप केला आहे. मी सीआयडी ऑफिस पुणे येथे सरेंडर होत आहे. संतोष देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी, फाशी द्यावी. राजकीय द्वेषापोटी माझे नाव त्याच्याशी जोडले जात आहे. पोलिस तपासात जर मी दोषी दिसलो तर न्यायदेवता जी शिक्षा देईल ती भोगायला तयार आहे असे वाल्मिक कराड याने स्पष्ट केले आहे. यासंदर्भात आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाष्य करताना शंका उपस्थित केली आहे. तसेच एक महत्त्वाची मागणी केली आहे.

बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात फरार असलेला वाल्मीक कराड हा पुण्यात सीआयडीला शरण आला आहे. यामुळे पुण्यातील सीआयडी मुख्यालयाबाहेर पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. उकऊ ची पथके मागील पंधरा दिवसापासून वाल्मीक कराड याचा शोध घेत आहेत. परंतू तो त्यांना सापडू शकला नव्हता. वाल्मिक कराडच्या शेवटच्या लोकेशनबाबत मोठी अपडेट समोर आली होती. कराड याचे शेवटचे लोकेशन मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये होते, यानंतर त्याचा फोन बंद असल्याचे समोर आले. वाल्मिक कराडने शरणागती पत्करल्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत.

गृहखात्याचे अपयश
पुरावे नष्ट केल्यावर वाल्मिक कराडने सरेंडर केले? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी एक्सवरील पोस्टमध्ये केला आहे. तसेच खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर २२ दिवस पोलिस-सीआयडी वाल्मिक कराडला पकडू शकले नाही. इतकेच नाही तर आज सरेंडर होताना हा कराड स्वत:च्या गाडीतून येतो. महाराष्ट्र पोलिस आणि गृहखात्याचे याहून मोठे अपयश असू शकत नाही! इतके दिवस वाल्मिक कराडला लपायला कोणी मदत केली? कोणाच्या संपर्कात तो होता? कोणाच्या सांगण्यावरून आज सरेंडर झाले या सगळ्यांचे सत्य समोर आले पाहिजे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR