27.9 C
Latur
Sunday, February 2, 2025
Homeक्रीडामाझ्या वडिलांवर झालेले वार दिसले नाहीत?

माझ्या वडिलांवर झालेले वार दिसले नाहीत?

बुमराह, मंधानालाही मिळाले अ‍ॅवॉर्ड

बीड : जे आरोपी आले होते, ते खंडणी मागण्यासाठी आले होते. त्यांनी आमच्या दलित बांधवांना हाणमार केली, म्हणून माझे वडील अडवण्यासाठी गेले होते. पण, माझ्या वडिलांवरच उलट हाणमार झाली. मला वाटते की, त्यांची फक्त हाणमार होती, पण माझ्या वडिलांवर किती वार झाले आहेत. मग ते वार त्यांना का दिसले नाहीत, असा थेट सवाल मृत सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख यांनी भगवान गडाचे महंत नामदेवशास्त्री यांना केला.

बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. या प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आली असून एकजण अद्याप फरार आहे. संतोष देशमुख यांची हत्या करणा-या आरोपींना शिक्षा मिळावी यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलने केली आहेत. दुसरीकडे, या प्रकणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी मोठ्या प्रमाणावर लावून धरली आहे. यावरून दबावतंत्राचा वापर केला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यातच भगवान गडाचे महंत नामदेवशास्त्री यांनी जाहीरपणे धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिला. यानंतर आता मृत संतोष देशमुख यांचे कुटुंब भगवान गडावर जाणार आहे. नामदेवशास्त्री यांना सर्व पुरावे देऊन न्याय मागणार असल्याचे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी म्हटले होते.

शास्त्रींचे वक्तव्य दु:खदायी
माझ्या वडिलांवर किती वार झालेले आहेत. रक्त सांगाळलेले आहे. माझ्या वडिलांवर किती घाव झाले, ते त्यांना दिसले नाहीत का, एका चापटीनंतर त्यांच्यावर किती घाव झाले, ते त्यांना का दिसले नाहीत, अशी विचारणा वैभवी देखमुख यांनी केली. तसेच न्यायाधीश सुद्धा वकिलांच्या दोन बाजू ऐकतो आणि नंतरच मत मांडतो. परंतु, शास्त्रींनी केलेल्या वक्तव्यामुळे आम्हाला दु:ख वाटते, अशी खंत वैभवी देशमुख यांनी बोलून दाखवली.

भगवानगड गुन्हेगारांच्या पाठीशी नाही
नामदेव शास्त्रींचा यू-टर्न
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणा-यांची मानसिकता समजून घेतली पाहिजे होती, त्यांनाही मारहाण झाली, त्यानंतर मस्साजोगमध्ये संतोष देशमुखांची हत्या झाली, असे वादग्रस्त वक्तव्य भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याने नाराज झालेल्या देशमुख कुटुंबियांनी आज (रविवार) नामदेव शास्त्रींची भेट घेऊन त्यांना आरोपींच्या गुन्ह्यांचा इतिहास आणि मस्साजोगमधील भांडणाचे कारण सांगितले. त्यानंतर नामदेव शास्त्रींनी दोनच दिवसानंतर यू-टर्न घेत भगवानगड गुन्हेगारांच्या पाठीशी नाही, अशी भूमिका घेतली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR