सोलापूर : तालुकास्तरीय झालेल्या स्पर्धेत दिलीपराव माने विद्यालयातील मुलीच्या संघाने विजय मिळविला. तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत दिलीपराव माने विद्यालयाचा १७ वर्षे वयोगट मुलींचा संघ विजयी झाला असून जिल्हास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेसाठी या मुलींच्या संघाची निवड झाली आहे.
मुलींच्या संघात कर्णधार नम्रता जाधव दीक्षा कासे, सबिया शेख, हिंदवी साबळे, संचिता कांबळे, वैभवी भोसले, स्नेहल पवार, समीक्षा डोके, स्नेहल साबळे, प्रतीक्षा कांबळे, सानिका नागणे, अमृता जाधव यांना क्रीडा शिक्षक अश्फाक अत्तार, धर्मदेव शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले यशस्वी खेळाडूंचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष संभाजी भडकुंबे सभापती रजनीताई भडकुंबे हगलूरचे उपसरपंच प्रगती भडकुंबे, मुख्याध्यापक राजेंद्र मोहोळकर, उमेश जगताप सचिन नाईक नवरे, अख्तर सय्यद, विनोद राऊत, तात्यासाहेब तांबे, सुधाकर पवार, सुप्रिया पवार, शशिकांत गायकवाड शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.