यवतमाळ : यवतमाळमध्ये घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला. यवतमाळच्या मंगरूळ येथील एक महिला गेल्या १४ दिवसांपासून बेपत्ता होती. महिलेच्या पतीने यासंदर्भात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनंतर पोलिसांनी महिलेचा कसून तपास सुरू केला. पोलिस तपासात, १४ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिलेची हत्या झाल्याचे समोर आले. उसाच्या शेतात महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.
संपूर्ण जिल्ह्यात या घटनेने खळबळ माजली आहे. साधना संजय जोगे (४०) असे मृत विवाहितेचे नाव असून नाना ऊर्फ ज्ञानेश्वर लक्ष्मण जोगे (४०) असे आरोपी दिराचे नाव आहे.
यवतमाळच्या मंगरूळ येथे मागील १४ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत उसाच्या शेतात आढळून आला. मृत महिलेच्या पतीची तक्रार आणि यवतमाळ ग्रामीण पोलिसांच्या तपासातून बेपत्ता महिलेच्या प्रकरणाचा छडा लागला.
महिलेच्या दिरानेच शेतीच्या वादातून महिलेची गळा आवळून हत्या केल्याचे उघडकीस आले. साधना संजय जोगे (४०) असे मृत विवाहितेचे नाव असून नाना ऊर्फ ज्ञानेश्वर लक्ष्मण जोगे (४०) असे आरोपी दिराचे नाव आहे. पती संजय जोगे यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपीस अटक केली आहे.