मुख्यमंत्री-भुजबळ यांच्यात चर्चा

सातारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नाराज छगन भुजबळ हे सातारा येथे एका कार्यक्रमादरम्यान एकत्र आले होते. तसेच देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांनी एकाच वाहनातून प्रवासही केल्याचे सांगितले गेले. पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्याकरिता या मूळ गावी आलो आहे. या ठिकाणी स्मारकाचा एक चांगला प्रकल्प तयार करण्याचे महाराष्ट्र शासनाने ठरवले आहे. त्याचे सादरीकरणही पाहिले आहे. लवकरात लवकर या ठिकाणी विस्तारित स्वरुपातील स्मारक व्हावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील असणार आहोत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

२०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. यानंतर झालेल्या मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपावेळी चांगलेच मानापमान नाट्य रंगल्याचे पाहायला मिळाले. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी तीव्र नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली. तसेच अजित पवार यांच्यावर सडकून टीकाही केली. अशातच छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर परदेशात गेलेले छगन भुजबळ मायदेशात परतले. छगन भुजबळ यांच्यासोबत काय चर्चा झाली, असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. यावर बोलताना, छगन भुजबळ यांच्याशी हीच चर्चा झाली की, महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य आपल्याला पुढे कसे नेता येईल, ज्या प्रकारे त्यांनी या देशाला दिशा देण्याचे काम केले आहे, ते विचार सर्वांपर्यंत कसे पोहोचवता येतील, समतायुक्त समाज, भारतीय संविधानाला मानणारा समाज आपल्याला कसा निर्माण करता येईल, हीच आमची चर्चा झाली. याव्यतिरिक्त कोणतीही चर्चा नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.

फडणवीस अद्यापही काही बोलले नाहीत : भूजबळ
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्रि­पदाचा शब्द दिला आहे का? असा प्रश्न छगन भुजबळ यांना विचारण्यात आला होता. यावर बोलताना, देवेंद्र फडणवीस मला मंत्रिपदाबाबात काही बोलले नाहीत. फक्त ७ ते १० दिवस थांबा नंतर चर्चा करु एवढेच ते म्हणाले होते. मला मंत्री करणार किंवा आणखी काही जबाबदारी देणार असे काहीही बोललेले नाहीत. मी देखील तसे काही सांगितले नाही, असे भुजबळांनी स्पष्ट केले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांची आरती | Ekmat Digital
11:29
Video thumbnail
Latur|पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या हस्ते एकमत कार्यालयातील गणरायाची आरती संपन्न
04:24
Video thumbnail
Nanded|बिलोलीत आयशर चालकाला बेदम मारहाण! VIDEO व्हायरल
01:12
Video thumbnail
Nanded|शिवणी आरोग्य केंद्रात डॉक्टरच नाहीत? 100-150 रुग्णांची गैरसोय
01:58
Video thumbnail
Latur|ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्याची काँग्रेसची मागणी
05:21
Video thumbnail
Latur|लातूर जि.प. अध्यक्षांच्या बंगल्यात चोरी; पोलिसांसमोर मोठं आव्हान
06:55
Video thumbnail
Latur|पिकं संकटात, जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न; छावा संघटनेचं उपोषण
10:32
Video thumbnail
Nanded|घंटानादाने सरकारला जागं करण्याचा प्रयत्न; नांदेडमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन
03:04
Video thumbnail
Nanded|दौरे नकोत, शेतकऱ्यांना मदत द्या’; रोहित पवारांची सरकारकडे मागणी
02:48
Video thumbnail
Latur|रेणापूर तालुक्यातील शेरा, समसापूर, गव्हाण येथे पिकांच्या नुकसानीची पाहणी
02:12
Video thumbnail
Nanded|पलंगावर झोपला अन् विषारी सापाने दंश केला; १७ वर्षीय रिहानचा मृत्यू
01:46
Video thumbnail
Dharashiv Rain Update|वाशीत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय, तेरखेड्यात गारपीट
01:20
Video thumbnail
Rohit Pawar|‘मोबाईलवर खेळणाऱ्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करा’; रोहित पवारांचा संताप
05:26
Video thumbnail
Rohit Pawar|रोहित पवारांसमोर शेतकऱ्याचा हंबरडा; अश्रूंनी मांडली व्यथा
02:01
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांची आरती | Ekmat Digital
04:49

Latest news