22.6 C
Latur
Friday, December 6, 2024
Homeमहाराष्ट्रआचारसंहिता भरारी पथकाच्या ५ जणांवर बडतर्फीची कारवाई

आचारसंहिता भरारी पथकाच्या ५ जणांवर बडतर्फीची कारवाई

उल्हासनगर : प्रतिनिधी
उल्हासनगर आचारसंहिता भरारी पथकाने चेक पोस्टच्या तपासणीत जप्त केलेल्या रक्कमेच्या प्रकरणी कोणतीही कारवाई न करता, ८५ हजाराची अफरातफर केल्याचा प्रकार उघड झाला. तब्बल १३ दिवसांनी पथकाच्या ५ कर्मचा-यांवर खंडणीचा गुन्हा दाखल करून निलंबित करण्यात आले. तसेच त्यांच्यावर बडतर्फीच्या कारवाईचे संकेत निवडणूक निर्णय अधिकारी विजयानंद शर्मा यांनी दिली.

उल्हासनगर निवडणूक आचारसंहिता पथक क्र-६ च्या कर्मचा-यांनी २८ ऑक्टोबर रोजी पहाटे फुल उत्पादक व्यापारी बबन आमले व त्यांचे मित्र नितीन शिंदे हे कल्याणवरून नगर व पुणे येथील शेतक-यांना फुल उत्पादनाच्या विक्रीचे पैसे देण्यासाठी जात होते. म्हारळ चौकीजवळ त्यांची गाडी अडवून तपासणी केली. तपासणीत त्यांच्याकडे ७ लाख ५० हजार रुपये रोख रक्कम सापडली. यानंतर पथकप्रमुखांनी आमले आणि श्ािंदे यांना गुन्हा दाखल करण्याची भीती दाखविल्यावर, त्यांनी पैशाच्या पावत्या दाखवून पैसे वैध असल्याचे स्पष्ट केले. तरीही त्यांनी जप्त केलेल्या रक्कमेपैकी ८५ हजार रुपये कोणतीही कारवाई न करता उकळण्यात आले. याप्रकरणी आमले व शिंदे यांनी तक्रार करूनही सदर प्रकार उघडकीस यायला १३ दिवस लागले.

सुनिल लोंढे यांच्या फिर्यादीवरून पथकातील पाच जणांविरुद्ध खंडणी आणि आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करण्यात आले. ५ पैकी ३ कर्मचारी महापालिकेचे असून २ कर्मचारी पोलीस आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी विजयानंद शर्मा यांनी पथकातील दोषी पाचही कर्मचा-यांवर बडतर्फ करण्याची कारवाई सुरु असल्याचे संकेत दिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR