26.1 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रजि. प. शाळेतील ५० हून अधिक विद्यार्थ्यांनाविषबाधा

जि. प. शाळेतील ५० हून अधिक विद्यार्थ्यांनाविषबाधा

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पैठणमधील केकत जळगाव जिल्हा परिषद शाळेमधील सुमारे ५० हून अधिक विद्यार्थ्यांना बिस्किटातून विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. बिस्किट खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना मळमळ, उलट्यांचा त्रास होऊ लागल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकारामुळे पालक संतप्त झाले आहेत.

पैठण तालुक्यातील केकत जळगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शनिवारी बिस्किट वाटप करण्यात आले होते. हे बिस्किट खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांचे पोट दुखू लागले. काही जणांना मळमळ, उलट्या होऊन सुमारे ५० हून अधिक विद्यार्थी तापाने फणफणल्याचे लक्षात आल्यावर या सर्व विद्यार्थ्यांना पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. काहींना सलाईन लावण्यात आले असून लहान मुले गळून गेली आहेत. सर्व मुलांवर उपचार सुरू असून या सर्व मुलांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिली आहे.

पैठणच्या केकत जळगावच्या जिल्हा परिषद शाळेत शनिवार असल्याने मुलांना बिस्किट वाटप करण्यात आले. बिस्किट खाताच विद्यार्थ्यांना त्रास होऊ लागला. पोटात दुखून मळमळ, उलट्या सुरू झाल्या. ५० हून अधिक विद्यार्थ्यांना हा त्रास झाल्याचे आढळून आले. यानंतर सर्व विद्यार्थ्यांना पाचोड येथे ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. बिस्किटातूनच विषबाधा झाली असल्याचे उघड झाले. काही विद्यार्थ्यांना सलाईन लावण्यात आले असून काहींवर उपचार सुरू आहेत. या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले असले तरी जि. प. शाळेत ही घटना घडल्याने पालकांमध्ये नाराजी आहे.

बिस्किटांची मुदत तपासली होती का?
जिल्हा परिषद शाळेतील बिस्किटांमुळे विषबाधा झाल्याचे उघड झाल्याने विद्यार्थ्यांचे पालक संतापले आहेत. शाळेत दिल्या जाणा-या खाद्यामधून विषबाधा होण्याचे प्रकार अलीकडे वाढल्याचे दिसत असताना पालकांमध्ये घबराट पसरू लागली आहे. विद्यार्थ्यांना बिस्किट देण्याआधी त्याची मुदत तपासली गेली होती का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR