ओबीसीच्या पहिल्या प्रमाणपत्राचे बुधवारी वितरण

हिंगोली : कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी करत उपोषणकर्ते मनोज जरांगे यांचा मोर्चा मुंबईत धडकला होता. मुंबईच्या आझाद मैदानातील उपोषणाच्या ५ व्या दिवशी सरकारने जरांगे यांच्या मागण्या मान्य करत मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटिरच्या आधारे ओबीसीतून आरक्षण देण्यास मान्यता दिली. त्यासंदर्भातील शासन निर्णयही जारी करण्यात आला होता. आता, त्याच जीआरच्या आधारे मराठवाड्यातील कुणबी मराठ्यांना ओबीसीचे प्रमाणपत्र जारी केले जात आहे.

मराठावाडा मुक्ती संग्राम दिनाचा मुहूर्त साधत मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांच्या हस्ते मराठा बांधवांना हे प्रमाणपत्र दिले जात आहे. हिंगोली जिल्ह्यांमध्ये उद्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या दिवशी ५० कुणबी जातीचे प्रमाणपत्र मराठा समाज बांधवांना वितरित केले जाणार आहेत. मराठा आंदोलक उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळावे, यासाठी मुंबईतील आझाद मैदानात उपोषण केले होते, मराठा समाजाच्या या आंदोलनाची दखल घेत राज्य शासनाने हैदराबाद गॅजेटिरचा शासन निर्णय जाहीर केला.

त्यानुसार, हैदराबाद गॅझेटियर लागू करत नोंदी सापडलेल्या, पुरावे असलेल्या कुणीबी मराठांना कुणीबी जातीचा ओबीसी दाखला देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार प्रशासनाच्या वतीने मराठा समाज बांधवांना आता कुणबी जातीचे प्रमाणपत्र वितरित केला जाणार आहे.

हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवळ यांच्याहस्ते हिंगोली जिल्ह्यातील ५० मराठा समाजातील लाभार्थ्यांना उद्याच हे कुणबी जातीचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. एकंदरीत याची पद्धत काय आहे कशा पद्धतीने हे जातीचे प्रमाणपत्र विक्री केले जाणार आहे या संदर्भात हिंगोलीचे उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांनी माहिती दिली.

त्रिसदस्यीस समितीकडून पडताळणी
महाराष्ट्र शासनाच्या २ सप्टेंबरच्या शासन निर्णयानुसार त्रिसदस्यी ग्रामस्तरीय समितीच्या पडताळणीनंतर नियमानुसार हे जात प्रमाणपत्र देण्यात आले आहेत. ज्या अर्जदाराकडे १९६७ च्या अगोदरचा पुरावा, किंवा ज्याकडे पुरावा नसेल त्यांनी तो संबंधित गावात राहात होता, तिथे शेती होती हे सिद्ध केल्यास त्या अनुंषगाने नागरिकांचे जबाब घेऊन, चौकशी करून हे प्रमाणपत्र देण्यात येत आहेत. त्यामध्ये, रक्तासंबंधातील नातेवाईकांना यापूर्वी कुणबी नोंदीचे प्रमाणपत्र देण्यात आले आहेत, याची खात्री करुन हे कुणबी प्रमाणपत्र जारी करण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांनी दिली.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|काँग्रेसचा उमेदवार असता तर माघार घेतली असती; उबाठाला जागा सुटल्याने निवडणूक लढणार– इंगोले
01:20
Video thumbnail
जळकोट तालुक्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी; वातावरणात पसरला गारवा
00:49
Video thumbnail
Latur|आमदार पुत्र ऋषिकेश कराड यांच्यावर जमीन खोदल्याचा आरोप; शेतकऱ्याची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार!
05:03
Video thumbnail
Nanded|प्रवीण पाटील चिखलीकर यांची विधान परिषद निवडणुकीतून माघार
08:45
Video thumbnail
Nanded|नांदेड विधान परिषद निवडणुकीतून माधवराव पाटील जवळगावकर यांची माघार
02:21
Video thumbnail
Nanded|अर्धापुरात दमदार पावसाची हजेरी; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
01:16
Video thumbnail
Latur|भूकंपग्रस्ताची तहसीलदारांकडून हेळसांड? न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या
01:38
Video thumbnail
Latur|अहिल्यादेवी जयंती न साजरी केल्याने ग्रामसेवकांवर कारवाईची टांगती तलवार
03:57
Video thumbnail
RCC CLASSES|फी परत करा, परवाना रद्द करा; RCC विरोधात हजारोंच्या आंदोलनाचा इशारा
01:27
Video thumbnail
सोलापुरात विषारी मद्यविरोधात प्रशासनाची धडक कारवाई; २४ लाखांचा मुद्देमाल जप्त, ‘झिरो टॉलरन्स’चे धोरण
03:08
Video thumbnail
मोहोळ-वैराग रस्ता रुंदीकरण: मोबदल्याशिवाय काम नको! बाधित शेतकऱ्यांचा तीव्र विरोध; हायकोर्टात धाव
02:23
Video thumbnail
Latur|तहसीलदारांसमोरच अंगावर पेट्रोल ओतल्याने खळबळ;पाच महिन्यांपासून प्रकरण प्रलंबित असल्याचा आरोप
01:56
Video thumbnail
Shivraj Motegavkar|कुलकर्णीच्या प्रॉपर्टीवर बुलडोजर;मोटेगावकरच्या इमारतीवर कारवाई कधी?"
02:48
Video thumbnail
Latur Airport|लातूर विमानतळ विकासाला गती; उद्योग-पर्यटन क्षेत्राला मोठा फायदा
03:39
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये भोंदूबाबाचा भांडाफोड;खोपेगावातील कथित बाबाचा दरबार बंद
03:01

Latest news