30.3 C
Latur
Tuesday, February 11, 2025
Homeपरभणीविधी महाविद्यालयाच्या ६८ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्राचे वाटप

विधी महाविद्यालयाच्या ६८ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्राचे वाटप

परभणी : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आणि श्री शिवाजी विधी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ७ रोजी श्री शिवाजी विधी महाविद्यालयात २६ वा दीक्षांत पदवीदान समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी ६८ विद्यार्थ्यांना मान्यवरांच्याहस्ते पदवी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

यावेळी अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. विजय माकणीकर, प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा व सत्र न्यायाधीश उज्ज्वला नंदेश्­वर, जिल्हा विधी प्राधिकरण सेवा सचिव तथा न्यायाधीश अर्चना तामने, प्रा. डॉ. राजेश बी. देशमुख हे परीक्षा विभाग प्रमुख म्हणून उपस्थित होते. यावेळी न्या. नंदेश्­वर यांनी कायद्याचा मानवी जन्मापूर्वीपासून ते मृत्यूपर्यंत येत असलेला संबंध आणि कायदेविषयक असलेल्या संधी याबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच एलएल.बी., बी.ए. एलएल.बी, एलएल.एम, डिटीएल. अभ्यासक्रमाच्या ६८ विद्यार्थ्यांना न्या. नंदेश्­वर यांच्या हस्ते पदव्यांचे वितरण करण्यात आले.

प्रारंभी परीक्षा विभाग प्रमुख प्रा. डॉ. राजेश देशमुख यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. एस. डी. जवंजाळ तर आभार प्रा. डॉ. हर्षा सूर्यवंशी यांनी मानले. यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालय विकास समितीचे सदस्य चंद्रशेखर नखाते, गोविंद कदम, मकदुम मोहिउद्दिन, संतोष बोबडे, ऍड. दिपक देशमुख, ऍड. अशोक शिंदे व संतोष इंगळे आदींनी अभिनंदन केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR