24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeसोलापूरजनाई जाधव शिवणकला पुरस्काराचे वितरण

जनाई जाधव शिवणकला पुरस्काराचे वितरण

सोलापूर / प्रतिनिधी

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ बाळे यांच्यावतीने शिवणकला क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना दिल्या जाणाऱ्या जनाई जाधव शिवणकला पुरस्कार वितरण आ. जयंत आसगावकर आणि सत्यप्रभादेवी रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.

शिवणकला क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामीण भागातील गुंजेगाव, ता. दक्षिण सोलापूर येथील रेणुका लोणारी आणि शहरी भागातून विष्णु मिल चाळ येथील अंबिका फडतरे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून संस्थेचे अध्यक्ष सचिन ठोकळ यांनी पुरस्काराचा उद्देश स्पष्ट केला. आ. जयंत आसगावकर यांनी संस्था आणि माजी आमदार निर्मलाताई ठोकळ यांच्या सामाजिक शैक्षणिक कार्याचा वसा विद्यमान अध्यक्ष आणि सचिवा पुढे नेत आहेत. त्यांचे कार्य प्रशंसनीय आहे. दादा आणि ताईचे सामाजिक सेवेचे कार्य निरंतर करत राहतील असा विश्वास व्यक्त केला.

संस्थेच्या सचिवा आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षा शिल्पा ठोकळ यांनी अध्यक्षीय मनोगतातून प्रत्येक स्त्रीने आर्थिक दृष्टीने स्वावलंबी बनण्यासाठी शिवणकला क्षेत्रातील अधिकाधिक ज्ञान मिळवून आपला विकास करण्याचे आवाहन उपस्थित विद्यार्थिनी आणि माता पालकांना केले.

या कार्यक्रमास शिक्षणाधिकारी सुलभा वटारे, संचालक किशोर पाटील, संचालक प्राचार्य दत्तात्रय
गाजरे, इंदिरा ज्ञानवर्धीनीचे सचिव भिकाजी गाजरे, अण्णासाहेब गायकवाड, मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष महेश सरवदे, विद्यानंद स्वामी, राजन कामत सर्व शाखांचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वनगे एस. के. व उपस्थितांचे आभार प्राचार्य मोहनराव घोडके यांनी मानले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR