16.5 C
Latur
Monday, November 25, 2024
Homeमहाराष्ट्रफेअर प्ले बेटिंग अ‍ॅप प्रकरणात धाडी

फेअर प्ले बेटिंग अ‍ॅप प्रकरणात धाडी

मुंबई : प्रतिनिधी
सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ‘फेअर प्ले’ बेटिंग अ‍ॅप प्रकरणात २१९ कोटी ६६ लाख रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली. त्यात राजस्थान, गुजरात, दमण, ठाणे व मुंबईतील डीमॅट खाते, जमीन, सदनिका व व्यावसायिक गाळ््याचा समावेश आहे. ‘फेअर प्ले अ‍ॅप’द्वारे आयपीएल प्रसारणासह २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालावरही सट्टेबाजी करण्यात आली होती. त्याप्रकरणी छाप्यांदरम्यान या मालमत्तेची माहिती मिळली होती.

महाराष्ट्र सायबर विभागाने स्वामित्त्व हक्क भंग केल्याप्रकरणी ‘फेअर प्ले’ अ‍ॅपसह इतर आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला होता. तक्रारदार ‘वायकॉम १८ नेटवर्क’ कंपनीकडे इंडियन प्रीमियर लीग (आपीएल) सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क होते. पण ‘फेअर प्ले’ नावाच्या अ‍ॅपवर बेकायदेशिररित्या सामन्यांचे प्रसारण करण्यात आल्याचा आरोप आहे. त्याप्रकरणी ईडी तपास करीत आहे.

‘वायकॉम १८’ कंपनीकडे आयपीएल सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क आहेत. पण ‘फेअर प्ले’ या अ‍ॅपवर सामान्यांचे बेकायदा प्रक्षेपण करण्यात आले. यावेळी सुमारे ४० चित्रपट कलाकारांनी या अ‍ॅपची जाहिरात केली. त्यामुळे डिजिटल स्वामित्त्व हक्कचा भंग झाल्याची तक्रार ‘वायकॉम १८’ने महाराष्ट्र सायबर पोलिसांकडे केली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR