28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeअंतरराष्ट्रीयजगभरात दिवाळी होतेय मोठ्या उत्साहात साजरी

जगभरात दिवाळी होतेय मोठ्या उत्साहात साजरी

न्यूयॉर्कमधील एम्पायर स्टेट बिल्डिंग दिव्यांनी उजळून निघाली

न्यूयॉर्क : आजपासून देशभरात दिवाळीला सुरुवात झाली आहे. देशासह जगभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. देशातील प्रत्येक घर दिव्यांनी उजळून निघत आहे, तर दुसरीकडे परदेशातही दिवाळी साजरी होत आहे. एम्पायर स्टेट बिल्डिंग गुरुवारी दिवाळीनिमित्त दिव्यांनी उजळून निघाली.

न्यूयॉर्कमधील भारताचे वाणिज्य दूतावास म्हणाले की, चमकणारे दिवे अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतीक आहेत. दिवाळी साजरी करण्यासाठी प्रतिष्ठित एम्पायर स्टेट बिल्डिंग केशरी दिव्यांनी उजळून निघाली आहे. हे अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतीक आहे. इस्रायलचे परराष्ट्र मंत्री इस्रायल कॅटझ यांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, माझा मित्र एस जयशंकर, मी तुम्हाला आणि भारतातील लोकांना दिवाळी २०२४ च्या शुभेच्छा देतो.

इस्रायल आणि भारत लोकशाही, स्वातंर्त्य आणि उज्ज्वल भविष्याची दृष्टी ही मूल्ये सामायिक करतात. दिव्यांचा हा सण आपल्या सर्वांना सुख, समृद्धी आणि शांती घेऊन येवो. दिवाळीच्या शुभेच्छा. भारतातील यूएस राजदूत एरिक गार्सेटी यांनीही शुभेच्छा दिल्या. त्यांनी एक्सवर पोस्ट शेअर केली. ते म्हणाले की, या दिवाळीत, मिशन इंडियामध्ये, भारतीय आणि अमेरिकन सर्वांसाठी आनंद आणि आशीर्वाद घेऊन येणारे हे दिवे वाटून घेत आहेत. संगीत, नृत्य, उत्सवाचा आनंद आणि कृतज्ञतेने भरलेल्या अंत:करणाने प्रकाशांचा सण साजरा करण्यासाठी उत्सवात आमच्यासोबत सामील व्हा. भारतातील यूएस मिशनच्या वतीने मी सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो.

रशियाचे राजदूत डेनिस अलीपोव्ह यांनीही हिंदीतून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर, मी आमच्या भारतीय मित्रांना मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांना आनंद आणि समृद्धीची शुभेच्छा देतो.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR