लातूर : प्रतिनिधी
संवाद प्रकाशन संस्था गेली २७ वर्षे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना यशाची गुरुकिल्ली देणारे शैक्षणिक दिवाळी अंक प्रकाशित करीत आहे. १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्रपणे चार अंक प्रकाशित केले आहेत. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही किमान पास होण्यापासून ते गुणवत्ता वाढीसाठी अंक प्रसिद्ध केले आहेत. १०वी मराठी, सेमी इंग्रजी व इंग्रजी तर १२वी सायन्सकरिता असे एकूण चार अंक प्रकाशित केले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातून २०२३ बोर्ड परीक्षेत व विषयात सर्वप्रथम आलेल्या गुणवान विद्यार्थ्यांच्या पुनर्लिखित उत्तरपत्रिका जशाच्या तशा देण्यात आल्या आहेत.
हे शैक्षणिक अंक विद्यार्थ्यांपुढे आदर्श निर्माण करणारे सखा सोबतीच ठरणार आहेत. यात १०वीच्या अंकामध्ये महाराष्ट्रातील विविध भागांतून सर्वप्रथम आलेल्या सिद्धी वाघमारे (लातूर), सुदर्शन खोडदे, पृथा भांडारकर (पुणे) आदी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. १२वी दिवाळी सायन्सच्या अंकातही विद्यार्थ्याच्या पुनर्लिखित उत्तरपत्रिका, सराव प्रश्नपत्रिका, गुणवान विद्यार्थ्यांचे यशासाठीचे कानमंत्र आदींचा समावेश आहे. सर्व स्तरावरील विद्यार्थ्यांनी बोर्ड परीक्षेच्या तयारीसाठी अंकाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रकाशक व संपादक विजय कोतवाल यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ९८२२७७९२५९ या क्रमांकावर संपर्क साधावा.