सोलापूर : रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीसमोरील वाघ्या श्वानाचा पुतळा हटवू नका अशी मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.
मैंदर्गी येथे भाजपची सभा होणार असल्याने त्यासाठी गुरुवारी दि. १७ एप्रिल रोजी मंत्री नितेश राणे व धडाडीचे आमदार गोपीचंद पडळकर सोलापुरात आले होते. यावेळी पत्रकार आणि त्यांना विविध विषयावर बोलते केले. यावेळी त्यांनी रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीसमोरील वाघ्या श्वानाचा पुतळा काढण्यास नकार दर्शवला. सरकारने एक तज्ज्ञ समिती नेमून यावर निर्णय घ्यावा असे सांगितले. विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांनी स्वत: वाघ्या शहराचा पुतळा हरवण्याची मागणी केली असताना त्यांच्याच पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे.
त्यांच्यावर मंगळसूत्र चोरीचा आरोप करणा-या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर परळकर यांनी कठोर टीका केली. ते लोक जेव्हा चड्डीत वावरत होते तेव्हापासून मी सफारी घालून कारमध्ये आहे. त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे मी लक्ष देत नाही असा टोला आ. पडळकर यांनी हाणला.