27.2 C
Latur
Thursday, May 15, 2025
Homeसोलापूररामदेवबाबांचा निषेध करण्याची अजित पवारांमध्ये हिंमत आहे का?

रामदेवबाबांचा निषेध करण्याची अजित पवारांमध्ये हिंमत आहे का?

सोलापूर : योगगुरू रामदेव यांनी ओबीसी समाजाचा अवमान करणारे वक्तव्य केले. या रामदेवांचा निषेध करण्याची हिंमत अजित पवार मित्र परिवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात गटात आहे का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला.

ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज यांच्या यात्रेसाठी रोहित पवार सोलापुरात होते. यात्रेत सहभागी होण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे हे रोहित पवार यांच्या सल्ल्यानुसार काम करतात, असा आरोप राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केला होता. यासंदर्भातील प्रश्नावर रोहित पवार म्हणाले, छगन भुजबळ हे दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंचावर होते. मराठा आरक्षण, लिंगायत आरक्षण, धनगर आरक्षणासाठी घटनात्मक दुरस्ती करणे आवश्यक आहे; परंतु पंतप्रधान मोदी यांच्यासमोर आरक्षणाचा हा शब्द काढण्याचे धाडस यांच्यामध्ये झाले नाही. हेच भुजबळ मंचावरून रस्त्यावर आल्यानंतर मंत्री असल्याचे विसरून जातात.

मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. माझ्यावर आरोप करतात. भुजबळांनी जातीय तेढ निर्माण करण्याचे काम थांबवावे. दोन दिवसांपूर्वी रामदेवबाबा यांनी ओबीसींचा अवमान करणारे वक्तव्य केले. या वक्तव्याचा निषेध करण्याचे धाडस यांच्यात नाहीत. अजित पवार मित्र परिवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात गटात निषेध करण्याची हिंमत आहे का, असा सवालही पवार यांनी उपस्थित केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR