24.5 C
Latur
Saturday, February 22, 2025
Homeमहाराष्ट्र‘‘भिऊ नकोस पवार मुंडेंच्या पाठिशी’’

‘‘भिऊ नकोस पवार मुंडेंच्या पाठिशी’’

आरोप सिद्ध झाल्याशिवाय मुंडेंवर कारवाई नाहीच अजित पवारांचा निर्धार विरोधकांसह स्वकीयांनाही पवारांचा धक्का

मुंबई : बीडमधील सरपंच हत्येवरून मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढत असून राष्ट्रवादीमध्येच अंतर्गत कलह वाढला होता. पण आता यावर अजित पवारांची स्पष्ट भूमिका घेतली असून त्यांनी आपल्या नेत्यांना झापताना, फक्त आरोपांच्या आधारे निर्णय घेतले जात नाहीत. सत्य समोर येईपर्यंत मुंडेंना पक्षाचा पाठिंबा असेल. त्यांच्यांवर कोणतीही कारवाई केली जाणार, असे स्पष्ट करीत जणू काही ‘‘भिऊ नकोस पवार मुंडेंच्या पाठिशी’’ असल्याचा निर्धार केला आहे.

बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरण चांगलेच तापलेले असून मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यातच कृषीमंत्री कार्यकाळातील भ्रष्टाचारावरून देखील त्यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यासह भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मोठे आरोप केले आहेत. या आरोपांमुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढ झाली असून विरोधकांसह स्वकीयांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर आपली थेट रोखठोक भूमिका घेतली आहे. तसेच धनंजय मुंडेंच्या कारवाईवर भाष्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता अजित पवार धनंजय मुंडेंच्या मागे ठाम उभे असल्याचेच दिसत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून धनंजय मुंडेंवर संतोष देशमुख प्रकरण, वाल्मिक कराडशी असणारे हितसंबंध, कृषीघोटाळ्यावरून आरोप सुरूच आहेत. त्यातच करूणा मुंडे यांच्या प्रकरणात देखील त्यांना पोटगी द्याली लागणार आहे. यामुळे पक्षाची बदनामी होत असल्याचा सूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांशी आळवला आहे. त्यातच विरोधकांनी देखील यावरून अजित पवार यांना टार्गेट करताना मुंडेंचा राजीनामा कधी घेणार अशी वितारणा केली होती. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, गुरुवारी रात्री देवगिरी बंगल्यावर बैठक घेतली. यावेळी मंत्री धनंजय मुंडे, प्रपुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते उपस्थित होते.

पवारांची रोखठोक भूमिका
यावेळी अजित पवार यांनी दोन तास चर्चा केल्यानंतर धनंजय मुंडे यांची पाठराखण करताना, जोपर्यंत त्यांच्यावरील आरोप सिद्ध होत नाहीत, तोपर्यंत पक्ष कोणतीही कारवाई करणार नाही, अशी रोखठोक भूमिका घेतली आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात नवा पेच निर्माण झाला आहे.

राजीनाम्याची मागणी जोर धरतेय
भाजप आमदार सुरेश धस आणि इतर विरोधी पक्षनेत्यांसह राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मुंडे यांच्यामुळे महायुती सरकार आणि पक्षाची बदनामी होत असल्याचा दावा केला होता. तसेच जर आपल्याच पक्षातील एखाद्यावर आरोप होत असताना त्याला पदावर ठेवणे कितपत योग्य आहे असा सवाल केला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR