नागपूर : कोणत्याही नेत्याला हा ओबीसींचा, मराठ्यांचा असे लोबल लावले जाऊ नये. नेता हा सर्वच समाजाचा असतो. फक्त एखाद्या जातीत जन्म घेतला म्हणून त्या समाजाच्या नावाने त्याला ओळखले जाऊ नये. आम्हाला अशी ओळख नको आहे. त्यापेक्षा चांगल्या कामाने जी ओळख निर्माण होते त्या नावाने आपल्याला ओळखल्यास जास्त आवडेल, असे मत पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले.
पंकजा मुंडे यांनी गुरुवारी नागपुरात पत्रकरांशी संवाद साधला. छगन भुजबळ यांची भाजपशी जवळिक वाढत असल्याबाबत विचारणा केली असता त्या म्हणाल्या, भूजबळ हे आमच्या मित्र पक्षात आहेत. महायुतीत आहेत. त्यामुळे जवळीकता आहे. राष्ट्रवादी आम्ही एकत्र आहोत. आम्ही विरोधी पक्षात नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नाग नदी संदर्भात आढावा घेतला जात आहे. नाग नदी, इंद्रायनी, पंचगंगा गोदावरी चंद्रभागा या नदीचा पुनर्जीवनसाठी पैसा मिळतो. पण हवा तसा रिझल्ट मिळत नाही. रस्त्याप्रमाणे नद्यांना सुद्धा एक स्पेशल प्रॉपर्टी म्हणून ट्रीट करून, त्यांचे स्वच्छता आणि मेंटेनेससाठी एक प्लॅनिंग करायला पाहिजे. नाग नदी संदर्भात चांगले इनपुट मिळतात. त्या इनपुवरून कन्सेप्ट नोट तयार करून काम करू असेही त्यांनी स्पष्ट केले.
पर्यावरण खात्याची पुनर्रचना
बुटीबोरी संदर्भात सुद्धा प्रदूषणाच्या तक्रारी आहे. त्यावर देखील चर्चा करणार आहोत. प्रदूषण खात्याचे काम प्रदूषण आहे. एवढच दाखवण्याचे आहे. पण त्यापलीकडे हे खात जावे, नोटीस न देता अंमलबजावणीसाठी काम करता यावे यासाठी या खात्याची पुनर्रचना करण्याचे काम सुरू आहे. अधिवेशनापर्यंत त्याला वेळ लागेल. प्रदूषणाचे वेगवेगळे झोन असतात. त्यावर आम्ही काम करू. तपासणीवर भर देऊ असेही मुंडे यांनी स्पष्ट केले.