21.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्ररक्ताचे नमुने बदलण्याचा सल्ला डॉ. तावरेंनी दिला

रक्ताचे नमुने बदलण्याचा सल्ला डॉ. तावरेंनी दिला

पुणे ‘हिट अ‍ॅन्ड रन’ प्रकरण तावरेंसोबत मकानदार याचाही समावेश

पुणे : पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणाचा सखोल तपास सुरु असून दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. या अपघात प्रकरणाशी संबंधित प्रत्येक व्यक्तीची सध्या कसून चौकशी सुरु असून या प्रकरणात विशाल अग्रवालच्या मुलाचे ब्लड रिपोर्ट बदलण्यात आल्याची धक्कादायक माहिती काही दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. याप्रकरणी पोलिसांनी ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक करण्यात केली होती.

आता या डॉक्टरांना रक्त बदलण्याचा सल्ला नेमका कुणी दिला याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित असताना अश्फाक मकानदार आणि ससून रुग्णालयातील न्यायवैद्यक शास्त्र विभागाचे अधीक्षक डॉ. अजय तावरे डॉ. तावरे यांनीच रक्त बदलण्याचा सल्ला दिल्याची माहिती समोर येत आहे. मकानदार आणि डॉ. तावरे यांनीच अल्पवयीन मुलाऐवजी आईचे रक्त बदलण्यास सांगितल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. विशाल अग्रवाल आणि मकानदारची एका कॅफेत भेट झाली होती. तुमच्यावर कारवाई होईल असा इशारा विशाल अग्रवालला मकानदारने दिला होता. या भेटीनंतर विशाल अग्रवाल हा संभाजीनगर येथे फरार झाला होता. पोलिसांनी त्याला संभाजीनगरमधून अटक केली होती.

मकानदार, गायकवाडला १० जूनपर्यंत पोलीस कोठडी
अल्पवयीन मुलाच्या रक्त नमुन्यात बदल केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने अश्फाक मकानदार आणि अमर गायकवाड या दोघांना अटक केली आहे. सध्या मकानदार आणि गायकवाड या आर्थिक व्यवहार करणा-या दोघांना १० जूनपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

अग्रवालविरूद्ध आणखी एक गुन्हा
कल्याणीनगर अपघातप्रकरणी चर्चेत असलेल्या सुरेंद्र अग्रवाल आणि विशाल अग्रवाल या पिता-पुत्रासह पाच जणांवर बांधकाम व्यावसायिकाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे अग्रवाल पिता-पुत्राच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. सावकारी कर्जाला कंटाळून वडगाव शेरी येथे राहणा-या ४१ वर्षीय बांधकाम व्यावसायिकाने ९ जानेवारी रोजी आत्महत्या केली होती. याप्रकरणी विनय विष्णुपंत काळे याच्यावर जानेवारीत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याच्या तपासात सुरेंद्रकुमार अग्रवाल, रामकुमार अग्रवाल, विशाल अग्रवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी रवी हुडलानी आणि मुकेश झेंडे यांचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR