24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeपरभणीआडत व्यापारी महासंघाच्या तालुकाध्यक्षपदी डॉ. जयप्रकाश मोदानी

आडत व्यापारी महासंघाच्या तालुकाध्यक्षपदी डॉ. जयप्रकाश मोदानी

पूर्णा : कृ.उ.बा समितीचे संचालक आडत व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. जयप्रकाश मोदानी यांची आडत व्यापारी महासंघाच्या तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. परभणी जिल्हा व्यापारी महासंघाच्या नेतृत्वाखाली दि.२२ नोव्हेंबर रोजी पूर्णा तालुकाध्यक्षपदी डॉ. जयप्रकाश मोदानी यांची सर्व नमूते निवड करण्यात आली. यावेळी जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सूर्यकांत हाके, कार्याध्यक्ष नितीन वट्टमवार, सचिव सचिन आंबीलवादे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

डॉ. मोदानी यांच्या निवडीबद्दल कृ.उ.बा. समितीचे सभापती बालाजी खैरे, उपसभापती नारायणराव पिसाळ, मा. उपसभापती संतोष अण्णा एकलारे, लक्ष्मणराव बोबडे, मा. सभापती अशोक बोकारे, ठाकरे गटाचे शहर प्रमुख मुंजाभाऊ कदम, सराफा असोसिएशनचे किरण कुलथे, सरपंच हरिभाऊ कदम, अमृतराज कदम, जब्बार शेठ थारा, नागनाथ भालेराव, लालू पुनपाळे, गोविंद डांगे, बळी काळबांडे, गोविंद मोरे, भगवानदास मुंदडा, दिलीपशेठ भालेराव, प्रमोद मुथा, बाबुराव आगलावे, रत्नाकरअप्पा एकलारे, प्रवीण कोतावार, रंगनाथराव शिंदे, जुगल शेठ मुंदडा, विष्णुदास पुनपाळे आदींनी त्यांचे अभिनंदन केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR