पुणे : रविवार दि. २९ डिसेंबर रोजी पुणे येथील निर्विकार आयुर्वेद याठिकाणी ‘निर्विकार समिट २०२४’ संपन्न झाली. या भव्य कार्यक्रमात डॉ. पवन लड्डा यांच्या आयुर्वेद क्षेत्रातील २४ वर्षांतील अतुलनीय योगदानाची दखल घेत, निर्विकार आयुर्वेद रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
निर्विकार आयुर्वेद रत्न पुरस्कार हा आयुर्वेद क्षेत्रातील डॉ. पवन लड्डा यांच्या अपार योगदानाचा सन्मान आहे. डॉ. पवन लड्डा यांनी केलेल्या ज्ञानाचा प्रसार आणि समर्पणाने आयुर्वेदाचे महत्त्व समाजात अधोरेखित झाले आहे. आपली निष्ठा, कष्ट आणि दूरदृष्टी आयुर्वेदाला नवी उंची गाठण्यास प्रवृत्त करतील, असा आम्हाला विश्वास आहे असे मनोगत पुरस्कार देताना संयोजकांनी व्यक्त केले. अगस्ती फार्माचे डॉ. अरविंद कडुस, प्रसिध्द आयुर्वेद तज्ञ रसिक पावसकर, नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. आशुतोष कुलकर्णी, डॉ. विनायक टेंभुर्णीकर, डॉ. शैलेश निकम, निर्विकार आयुर्वेदचे संयोजक वैद्य निलेश लोंढे, वैद्य सारिका लोंढे यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
डॉ. पवन लड्डा यांच्या आयुर्वेदिक उपचारांची कार्यक्षमता आणि अचूक निदान पद्धती यांनी आयुर्वेद शास्त्राला आधुनिक संदर्भात नवी दिशा दिली आहे असे गौरवोदगार संयोजकांनी व्यक्त केले. यावेळी सुसज्ज निर्विकार आयुर्वेद पंचकर्म हॉस्पिटलचे उद्घाटन व आयुर्वेद दिनदर्शिका चे प्रकाशन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.