पुणे : प्रतिनिधी
मंगेशकर हॉस्पिटल मधील डॉ. सुश्रुत घैसास यांनी पदाचा राजीनामा रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
दरम्यान डॉ. केळकर यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन बाजु मांडण्याचा प्रयत्न केला. रुग्णाकडून उपचाराआधी डीपॉझिट घेतले जात नाही. तशी पद्धत नाही. पण त्यावेळी कसे घडले हे पाहावे लागेल. रुग्णाला खर्चाबाबतचे अंदाज पत्रक देण्यात येते. त्यावर डिपॉझिट रक्कम लिहिली जात नाही. आजवर मी स्वत: अनेक शस्त्रक्रिया केल्या आहेत पण असे केलेले नाही असेही ते म्हणाले.