28.6 C
Latur
Friday, December 20, 2024
Homeलातूरडॉ. अनिल भिकाणे कर्तृत्व गौरव पुरस्काराने सन्मानित

डॉ. अनिल भिकाणे कर्तृत्व गौरव पुरस्काराने सन्मानित

उदगीर : प्रतिनिधी
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापिठाचे विस्तार शिक्षण संचालक प्रा. डॉ अनिल उद्धवराव भिकाने यांना नुकतेच मुंबई येथे व्हेटरनरी प्रक्टिशनर्स वेलफेअर असोसिएशन मुंबई तर्फे कर्तृत्व गौरव २०२४ ‘ हा मानाचा पुरस्कार देवून गौरवण्यात आले आहे. सदरील  पुरस्कार नवी मुंबई येथे एका शानदार सोहळ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे हस्ते तर प्रसिद्ध कलाकार डॉ. नितिश भारद्वाज, असोशिएशनचे अध्यक्ष डॉ. राहूल मुळेकर व सचिव डॉ. रोहित गायकवाड यांचे उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार डॉ. भिकाने यानी उदगीर, अकोला व नागपूर येथे केलेल्या ३५ वर्षाच्या प्रदिर्घ सेवेत सातत्यपूर्ण उल्लेखनिय विस्तार कार्याबद्दल देण्यात आला.  डॉ. भिकाने यानी उदगीर येथील कार्यकाळात चिकित्सालयाच्या माध्यमातून गरजू  शेतक-यांना अहोरात्र सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे. चारशेहून अधिक खेड्यात भव्य शेतकरी मेळावे व पशुरोग निदान शिबिराचे आयोजन करून  पशुपालकाना तज्ञांची सेवा उपलब्ध करून दिली.  मराठवाड्यात दुष्काळी परिस्थितीत ३७ चारा छावण्याना भेटी देवून १४५ शेतकरी जागरूकता कार्यक्रमाद्वारे प्रबोधन केले. नागपूर येथे विस्तार संचालक पदावर कार्यरत असताना लंपी चर्मरोग साथीत रोगोपचार तसेच नियंत्रण कार्यात राज्य टास्क फोर्सचे मेंबर म्हणून मोलाचे योगदान दिले आहे. तर विद्यापीठ परिसरात सुरेख म्युजियम साकारले आहे. सध्या ते किसान से किसान तक हा अभिनव उपक्रम राबवत आहेत.
 ते महाराष्ट्रभर मराठीतील लेख, रेडिओ व  दुरदर्शन वरील मुलाखती तसेच प्रशिक्षण व शेतकरी मेळाव्यातून प्रबोधन करीत आहेत. त्यांनी लिहलेली इंग्रजी-मराठी पुस्तके देशभर पशुवैद्यकात व राज्यात शेतक-यात लोकप्रिय आहेत. त्यांना राष्ट्रीय स्तरावरील तिन सुवर्णपदकासह माफसूचे आदर्श प्राध्यापक, सर्वोत्कृष्ट संशोधक व विस्तार कार्यकर्ता असे तिन्ही बहुमान मिळाले आहेत. सदरील पुरस्कार प्राप्त झाले बद्दल डॉ. नितिन पाटील, माजी कुलगुरू डॉ. ए. टी. शेरीकर, माजी कुलगुरू डा.ॅ आशीश पातुरकर, डॉ. शैलेंद्र रेड्डी, डॉ. अनिल पाटील, डॉ प्रफुल्ल पाटील, कुणाल घुंगार्डे यांचे सह प्राध्यापक विद्यार्थी पशुवैद्यक जिव्हाळा ग्रुप आदीनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR