लातूर : प्रतिनिधी
येथील दयानंद विधी महाविद्यालयातून शिक्षण घेतलेल्या अनेक वकीलांच्या वतीने दयानंद विधी महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य कुलगुरु डॉ. शिवराज नाकाडे व प्रा. भास्करराव कंकाळे यांचा त्यांचेप्रती कृतज्ञता म्हणून ऋण निर्देश सोहळा दयानंद कॉलेजच्या सभागृहात आयोजित केला होता.
हा सोहळा उत्साहात पार पडला. अध्यक्ष न्यायूमर्ती अंबादास जोशी होते. विचार मंचावर न्यायमूर्ती शिवकुमार डिगे, अॅड. अण्णाराव पाटील, लक्ष्मीरमण लाहोटी, रमेश बियाणी, अॅड. आर. वाय शेख, प्राचार्या श्रीमती नाथानी, लातूर वकील मंडळाचे अध्यक्ष महेश बामणकर उपस्थित होते. न्यायमूर्ती शिवकुमार डिगे यांच्या संकल्पनेतून हा सत्कार सोहळा आयोजित झाला होता. यासाठी त्यांनी ही जबाबदारी अॅड. बळवंत जाधव, अॅड. उदय गवारे, अॅड. अशिश बाजपाई, अॅड. राजमाने, व्यंकटराव बेद्रे, अॅड. काळे, अॅड. अण्णाराव पाटील, अॅड. संजय पांडे यांचेवर सोपवली होती. अॅड. गलाले व अॅड. उदय गवारे यांनी मापत्राचे वाचन केले. कार्यक्रमास अॅड. मनाळे, अॅड. ढगे, अॅड. आगरकर, अॅड. मधुकरराव राजमाने, अॅड. इंगळे, प्रा. बी.व्ही. मोतीपवळे, डॉ. दडगे इत्यादी असंख्य वकील मंडळी उपस्थित होती.