25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeपरभणीडॉ. कांचनगौरी शिंदे यांच्या काचबिंदूवरील शस्त्रक्रिया व्हीडीओची राष्ट्रीय पातळीवर निवड

डॉ. कांचनगौरी शिंदे यांच्या काचबिंदूवरील शस्त्रक्रिया व्हीडीओची राष्ट्रीय पातळीवर निवड

परभणी : सोनपेठ तालुक्यातील डिघोळ येथील रहिवासी व सध्या लातूर येथे वास्तव्यात असणारे नेत्रतज्ज्ञ डॉ. दत्तात्रय मुंजाजी शिंदे यांच्या पत्नी डॉ. कांचनगौरी शिंदे (सातपूते) यांच्या काच बिंदूवरील शस्त्रक्रियेच्या व्हीडीओची राष्ट्रीय पातळीवर निवड झाली आहे.

डॉ. शिंदे व डॉ. कांचनगौरी यांनी दिल्ली, हैदराबाद येथे काही काळ रुग्णांची सेवा केली आहे. डॉ. कांचनगौरी या दिल्ली एम्सच्या सुवर्णपदक विजेत्या आहेत. शिंदे दाम्पत्यांनी नेत्रतज्ज्ञ म्हणून राज्याबाहेर केलेल्या सेवेचा आता मराठवाड्याच्या रुग्णांसाठी पुढे लाभ व्हावा या उद्देशाने पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे, हैदराबाद, मुंबईच्या धर्तीवर लातूर येथे अत्याधुनिक विविध तपासणी यंत्राची उपलब्धता करून विमल हॉस्पिटलची उभारणी केली. मराठवाड्यातील या अत्याधुनिक नेत्र रुग्णालयामुळे लातूर, परभणी, बीड, धाराशिव या परिसरातील रुग्णांना आता एका छताखाली सर्व सुविधा उपलब्ध झाली आहे.

डॉ. कांचनगौरी यांनी रुग्णावर केलेल्या काच बिंदू शस्त्रक्रियेचा व्हीडीओ देशात प्रसारित झाला. ऑल इंडिया आँप्थोल्मोलाँजिकल सोसायटी सायंटिफिक कमिटीने या व्हीडीओची दखल घेऊन राष्ट्रीय पातळीवर निवड केली आहे. त्यांच्या या यशाबद्दल खा. डॉ. शिवाजीराव काळगे, आ. राजेश विटेकर, सोनपेठचे माजी उपनगराध्यक्ष दत्तात्रय कदम, डिघोळच्या सरपंच राधाबाई शिंगाडे, उपसरपंच अजय देशमुख, पत्रकार शिवमल्हार वाघे, सुभाष सुरवसे, लातूरचे युवा उद्योजक वैभवराव काळे, शिवसेना अल्पसंख्यांक प्रदेश उपाध्यक्ष खदीरबापू विटेकर, नागनाथ शिंगाडे आदींनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR