27.6 C
Latur
Friday, November 22, 2024
Homeमहाराष्ट्रडॉ. विना देव यांचे निधन

डॉ. विना देव यांचे निधन

पुणे : प्रतिनिधी
लेखन, संकलन, संपादन असे साहित्य प्रकार लीलया हाताळून अभिवाचनाच्या माध्यमातून अभिजात साहित्याच्या प्रचारात योगदान देणा-या ज्येष्ठ लेखिका आणि मराठीच्या विद्यार्थीप्रिय प्राध्यापिका डॉ. वीणा देव (७५) यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी निधन झाले. त्या ज्येष्ठ लेखक गो. नी. दांडेकर यांच्या कन्या होत. त्यांच्यामागे प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्यासह दोन मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.

गोनीदा यांच्यामुळे वीणा देव यांच्यावर घरातच मराठी भाषा आणि साहित्याचे संस्कार झाले. शाहू मंदिर महाविद्यालयात त्यांनी ३२ वर्षे अध्यापन कार्य केले. विभागप्रमुख म्हणून त्या सेवानिवृत्त झाल्या होत्या. ‘मराठी कथा-कादंब-यांची नाट्यरूपे’ या विषयावर प्रबंध सादर करून त्यांनी पीएच. डी. संपादन केली होती. पती डॉ. विजय देव, मृणाल आणि मधुरा या कन्या आणि जावई रुचिर कुलकर्णी यांच्यासमवेत वीणा देव यांनी गो. नी. दांडेकर यांच्या कादंब-यांच्या अभिवाचनाचे साडेसहाशेहून अधिक प्रयोग केले.

गोनीदा यांच्या स्मरण जागरणासाठी त्यांनी मृण्मयी पुरस्कार, दुर्ग साहित्य संमेलन असे उपक्रम राबविले होते. मृण्मयी प्रकाशनाच्या माध्यमातून त्यांनी गोनीदा यांच्या दुर्मीळ साहित्यकृती प्रकाशित केल्या होत्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR