25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रडॉ. विश्वनाथ कराड हेच एक विद्यापीठ

डॉ. विश्वनाथ कराड हेच एक विद्यापीठ

पुणे : शतकभरापूर्वी शिकागो शहरात भारत विश्वगुरू होणार हे स्वामी विवेकानंदांनी पाहिलेले स्वप्न, सत्यात उतरविण्याचा संकल्प घेतलेले प्रा. डॉ. विश्वनाथ कराड हे ख-याअर्थाने नवनिर्मितीचा एक प्रचंड मोठा स्त्रोत आहेत. ‘पॉलिमर इंजिनिअरिंग’ ही संकल्पना कोणीही मांडली नसताना, डॉ. कराड ती माझ्याकडे घेवून आले. त्यावेळी आपण, तिर्थक्षेत्रांकडून ज्ञानक्षेत्रांकडे वळायला हवे, अशी मी मांडलेली संकल्पना डॉ. कराडांनी सत्यात उतरवून दाखवली. त्यामुळे अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे डॉ. कराड हे मला नवनिर्मितीचे एक विद्यापीठच वाटतात, अशी भावना जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ पद्मविभूषण मिळविलेले डॉ. रघुनाथ ए. माशलेकर यांनी व्यक्त केले.

पुणे शहरातील विविध सामाजिक संस्था व समस्थ पुणेकरांच्या वतीने माईर्स एमआयटी शिक्षण समुहाचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांचा ‘विश्वशांतीरत्न’ या नागरी पुरस्काराने गौरव करण्यात आला. तसेच, सीओईपी टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी संघटनेच्यावतीने डॉ.कराडांचा ‘जीवनगौरव’ पुरस्कारानेही गौरव करण्यात आला. याप्रसंगी, जगप्रसिद्ध संगणक शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर, खा. श्रीनिवास पाटील, पंडीत गाडगीळ, ह.भ.प. बापूसाहेब मोरे, नॅकचे माजी चेअरमन डॉ. भूषण पटवर्धन, डॉ. श्रीपाल सबनीस, उल्हास पवार, डॉ. सुनील बिरूड, डॉ. राजेंद्र शेंडे, डॉ. प्रमोद चौधरी, आचार्य रतनलाल सोनाग्रा, डॉ. एन. एस. पठाण, सीओईपी माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष भरत गित्ते आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना डॉ. भटकर म्हणाले, स्वामी विवेकानंदांनी शिकागोतील ज्या सभागृहात १३१ वर्षांपूर्वी भाषण केले, तिथेच डॉ. कराडांना भाषण करण्याची संधी मिळाली यापेक्षा अभिमानाची गोष्ट ती कोणती?. डॉ. सबनीस यांनी ‘रामकृष्ण हरीच्या जपात डीलीट पदवी स्विकारणारे, डॉ.विश्वनाथ कराड’ असा उल्लेख करत आपल्या भाषणाची सुरुवात केली. नॅकचे माजी चेअरमन डॉ.पटवर्धन, पंडीत वसंत गाडगीळण, संत तुकाराम महाराज देवस्थानचे माजी अध्यक्ष ह.भ.प. बापूसाहेब मोरे यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या.

सीओईपीने मला घडविले : डॉ. कराड
आपल्या पुरस्काराच्या उत्तरात डॉ. कराड यांनी सीओईपीतील त्यांच्या आठवणींना उजाळा देताना, सर्वांचे आभार मानले. ते म्हणाले, या सभागृहात प्रवेश करण्यापूर्वी मी माझ्या मॅकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाला भेट दिली. कारण, या विभागाचा आणि एकंदर सीओईपीचा माझ्या जडणघडणीत फार मोठा वाटा आहे. तसेच माझ्या आयुष्यात डॉ. माशलेकर आणि डॉ. भटकर यांनी केलेले मार्गदर्शनही अत्यंत मोलाचे होते असे मत डॉ. कराड यांनी यावेळी मांडले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR