22.3 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeराष्ट्रीयडीआरडीओचे पाणबुडीतून मारा करणारे प्राणघातक क्षेपणास्त्र तयार

डीआरडीओचे पाणबुडीतून मारा करणारे प्राणघातक क्षेपणास्त्र तयार

नवी दिल्ली : डीआरडीओने पाणबुडीतून मारा करू शकणारे घातक क्षेपणास्त्र तयार केले आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात डीआरडीओने याची गुप्त चाचणी घेतली होती. हे क्षेपणास्त्र ४०२ किलोमीटर अंतरावरील लक्ष्यावर यशस्वी मारा करू शकतो. चाचणी दरम्यान, या क्षेपणास्त्राने प्रत्येक मिशन पूर्ण केले. याला एसएलसीएम म्हणजेच पाणबुडी लाँच क्रूझ मिसाइल असेही म्हणतात. याची रेंज ५०० किलोमीटरपर्यंत वाढवता येऊ शकते, असे सांगण्यात आले आहे. या क्षेपणास्त्राचे दोन प्रकार आहेत. एक जमिनीवरून जमिनीवर हल्ला करणारे क्षेपणास्त्र आणि दुसरे पाण्यातून आकाशात मारा करणारे क्षेपणास्त्र.

तसेच भारतीय हवाई दल (आयएएफ) एलसीए मार्क १ए लढाऊ विमानासाठी स्वदेशी जॅमर पॉड विकसित करण्याच्या प्रकल्पावर काम करत आहे. हवाई दलाच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, त्याच्या बेस दुरुस्ती डेपोंना त्याच्या लढाऊ आणि वाहतूक विमाने आणि इतर शस्त्रास्त्र प्रणालींसाठी आवश्यक असलेली अनेक उपकरणे स्वदेशी बनविण्याचे आणि आयात कमी करण्याचे काम सोपविण्यात आले आहे.

भारताकडे धोकादायक क्षेपणास्त्र
भारताकडे सध्या एक आण्विक पाणबुडी आणि सुमारे १६ सामान्य पाणबुड्या आहेत. भारताकडे पाणबुडीवरून मारा करणारे धोकादायक क्षेपणास्त्र आहे. त्यांचे लक्ष्य देखील अचूक आहे.

जगातील एकमेव क्षेपणास्त्र
हे क्षेपणास्त्र ५.६ मीटर लांब आहे, याचा व्यास ५०५ मिलीमीटर आहे आणि वेग ०.७ मॅच आहे, म्हणजे ताशी वेग ८६४ किलोमीटर आहे. हे क्षेपणास्त्र टॉर्पेडो ट्यूबमधून सोडण्यात आले आहे. हे जगातील एकमेव क्षेपणास्त्र आहे ज्याची पल्ला ५०० किमी पर्यंत आहे आणि जे टॉर्पेडो ट्यूबमधून सोडले जाते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR