22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeमुख्य बातम्यागुजरातमध्ये हजारो कोटीचे ड्रग्ज जप्त

गुजरातमध्ये हजारो कोटीचे ड्रग्ज जप्त

पोरबंदर : गुजरातचा समुद्र किनारा हा ड्रग्जचे आगार झाल्याची परिस्थिती आहे. इथे पुन्हा एकदा मोठा ड्रग्जचा साठा नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोने पकडला आहे. ३,३०० किलो वजनाचे हजारो कोटींचे हे ड्रग्ज आहे. गुजरात एटीएस, एनसीबी आणि तटरक्षक दलाने ही संयुक्त कारवाई केली.

भारतीय तटरक्षक दलाने तस्करीत गुंतलेल्या संशयास्पद जहाजाला थांबवले. एटीएस, एनसीबी आणि नौदलाची ही सर्वात मोठी संयुक्त कारवाई ठरली. पकडलेल्या बोटी आणि चालक दलासह जप्त करण्यात आलेले ड्रग्ज हे भारतीय बंदरात कायदा अंमलबजावणी एजन्सीकडे सुपूर्द करण्यात आले आहे.

एटीएस, एनसीबी आणि भारतीय तटरक्षक दलाने गुजरातच्या पोरबंदर इथे एक मोठी संयुक्त कारवाई केली. यामध्ये एका जहाजातून गुजरातच्या किना-यावर आणण्यात येत असलेले ३,३०० किलो पेक्षा जास्त ड्रग्जचा साठा जप्त केला. याप्रकरणी ५ क्रूना अटक करण्यात आली. ते इराणी आणि पाकिस्तानी असल्याचा संशय आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची किंमत हजारो कोटी रुपये आहे.

३,३०० किलोहून अधिक ड्रग्जचा साठा
या जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जमध्ये ३,०८९ किलो चरस, १५८ किलो मेथॅम्फेटामाइन, २५ किलो मॉर्फिनचा समावेश आहे. सुमारे ३,३०० किलोहून अधिक वजनाचा हा ड्रग्जचा साठा समुद्रमार्गे घेऊन जाणारा एक कंटेनर पोलिसांनी पकडला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR