पूर्णा : येथील पोलिस ठाण्यातील श्रेणी एक पोलिस उपनिरीक्षक यांनी शनिवारी सकाळी टाटा सुमो गाडी एम एच १२ केएन ३८६० तहसिल रोडवर भरधाव वेगात चालवून बळीराजा साखर कारखाना येथील कर्मचारी यांच्या शाळकरी मूलांच्या बसला जोरदार धडक दिली. सदरील पोउपनि. मेटे यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरील अपघाताची तक्रार शाळा बस चालक गणेश थोरात यांनी पूर्णा पोलिस ठाण्यात दिल्यानंतर टाटा सुमो गाडी सरकारी दवाखान्यात नेली असता पोनि. विलास गोबाडे, पोउपनि. शिवप्रसाद क-हाळे यांनी दारूच्या नशेत असलेल्या पोउपनि. मेटे यास खाली उतरवून डॉक्टरांना बोलावून तोंडात मशीन लावून दारुची चाचणी घेतली. पोलिस अधिकारी यांनी पोलिस अधिक्षक परभणी यांना रिपोर्टींग केल्यानंतर पोउपनि. मेटे विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मुळे नेहमी दारुच्या नशेत राहणा-या काही पोलिस कर्मचारी यांची धाबे दणाणले आहे.