16.2 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeआरोग्यताणतणावामुळे ‘स्ट्रेस इटिंग’चे बळी वाढतायेत!

ताणतणावामुळे ‘स्ट्रेस इटिंग’चे बळी वाढतायेत!

टेन्शनमध्ये तुम्हालाही सारखी भूक लागतेय आरोग्य तज्ज्ञांकडून मार्गदर्शिका जारी

नवी दिल्ली : बदलती जीवनशैली, खाण्याच्या अयोग्य वेळा, कामाचा ताण, अनेक जबाबदा-यांमुळे माणूस विविध आजारांनी ग्रासला आहे. अशात काहींचे वजन वाढत चालले आहे, तर काहींना टेन्शनमध्ये भरपूर खावंसं वाटतं. पण असं असेल तर सावधान, कारण तुम्हीही स्ट्रेस इटिंगच्या तर आहारी गेला नाहीत ना, असा प्रश्न येथे उद्भवतो.

आजच्या धावपळीच्या जीवनात लोक कोणत्या ना कोणत्या मार्गाने त्रस्त असतात, त्यामुळे ते अनेक प्रकारच्या आरोग्य समस्यांना बळी पडतात. आपली जीवनशैली अशी बनली आहे की, आपण अनेकदा तणावाचे बळी ठरतो. तणावापासून लक्ष विचलित करण्यासाठी आणि बरे वाटण्यासाठी आपण अनेकदा टेन्शनमध्ये खातो. तणावपूर्ण आहारामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते आणि तुम्ही अनेक आजारांना बळी पडू शकता. बदलत्या जीवनशैलीमुळे बहुतेक लोक तणाव आणि चिंताग्रस्त असतात. तणावामुळे शरीरात अनेक प्रकारचे बदल दिसू लागतात, त्यापैकी एक म्हणजे टेन्शनमध्ये खाणे.

स्ट्रेस हार्मोन्सच्या वाढीमुळे हे घडते
स्ट्रेस इटिंगच्या समस्येमध्ये, लोक तणावात असताना जास्त खाणे सुरू करतात किंवा काही जंक फूड म्हणजेच आरोग्यसाठी चांगले नसलेले पदार्थ खातात, ज्यामुळे ते लठ्ठपणा, रक्तदाब आणि मधुमेह यांसारख्या अनेक आजारांना बळी पडतात. शरीरात कॉर्टिसोल या स्ट्रेस हार्मोन्सच्या वाढीमुळे हे घडते. त्यामुळे जास्त भूक लागते.

स्ट्रेस इटिंग कशी टाळावी?
ताणतणाव टाळण्यासाठी आरोग्यदायी आहार घेणे गरजेचे आहे, कारण भरपूर प्रथिने, कार्ब्स आणि फायबरचे सेवन केल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते. हे तुम्हाला तणावात असतानाही जास्त खाण्यापासून वाचवेल. स्ट्रेस खाण्यामुळे तणाव निर्माण होतो. अशा परिस्थितीत तणावमुक्त राहण्यासाठी तुम्ही मॉर्निंग वॉक, व्यायाम, योगा इत्यादी करू शकता. यामुळे एकाग्रता वाढते. यासोबतच तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यही सुधारते.

आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करा
ताणतणावापासून दूर राहण्यासाठी निरोगी जीवनशैलीचा अवलंब करणे अत्यंत आवश्यक आहे. ज्यामध्ये सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंतची रोजची वेळ आणि खाण्याची आणि नाश्त्याची वेळ निश्चित करून सर्व कामे वेळेवरच करावीत. असे केल्याने तुम्ही आरोग्यासाठी चांगले नसलेले अन्न खाणे टाळू शकता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR