परभणी : औंढा तालुक्यातील पोटा येथील साप चावलेल्या एका महिलेला परभणी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. ही महिलेची तब्येत अतीशय चिंताजनक होती परंतू या ठिकाणच्या डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करून या महिलेला जीवनदान दिले आहे. या बद्दल रूग्ण महिलेच्या नातेवाईकांनी जिल्हा शासकीय रूग्णालयाचे अधीष्ठाता डॉ. एस. एस. भिसे यांचा व डॉक्टरांचा यथोचित सत्कार करून अभार मानले.
पोटा येथील महिलेला साप चावल्याने दि. १९ जून रोजी परभणी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. ही महिला बेशुध्द अवस्थेत होती. या महिलेचा जीव वाचवण्यासाठी जिल्हा शासकीय रूग्णालया अधिष्ठाता डॉ. भिसे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार, अतिरीक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सारीका बडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. दत्ता खरवाडे, डॉ. शरद अवचार, डॉ. गायकवाड, डॉ. गिरी, डॉ. येलने, श्रीमती डॉ. काझी, डॉ. रिजवान काझी यांनी शर्थीचे प्रयत्न करून या महिलेला जीवनदान दिले.
यासाठी इंचार्ज परीसेविका सुरे, परीचारीका चंदा कोलपे, तारा गलांडे, उषा शिंदे, शितल राऊत, अर्चना सवंडकर, संगीता राऊत, सुरेखा शेंगडे, पल्लवी शिंदे, ज्ञानेश्वरी जाधव, रोहिणी टेंगसे, नजमा सिद्दीकी, महालॅब टेक्निशीयन सुरज इंगोले, सेवक शेख अमेर, शेख इम्रान, शेख अरबाज, नारायण, इस्माईल, कालिंदा आदिंनी मदत केली. या सर्वांचा रूग्णांच्या नातेवाईकांच्या वतीने शाल, पुष्पगुच्छ व पेढे वाटप करून आभार मानण्यात आले.