27 C
Latur
Saturday, December 21, 2024
Homeअंतरराष्ट्रीयबांगलादेशात दुर्गा पूजेवर बंदी, मंडळांना कर, मूर्तींची तोडफोड

बांगलादेशात दुर्गा पूजेवर बंदी, मंडळांना कर, मूर्तींची तोडफोड

ढाका : वृत्तसंस्था
सत्तांतरानंतर बांगलादेशमधील परिस्थिती मोठ्या प्रमाणात बदलली असून, येथे धार्मिक अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंना मोठ्या प्रमाणावर टार्गेट करण्यात येत आहे. बंगालप्रमाणेच बांगलादेशी हिंदूही नवरात्रौत्सव आणि दुर्गा पूजा मोठ्या प्रमाणात साजरा करतात. मात्र बांगलादेशात यावेळी दूर्जा पूजेवरून वाद सुरू आहे. अनेक ठिकाणी हिंदूंना दुर्गा पूजेची परवानगी नाकारण्यात आली आहे. काही ठिकाणी देवीच्या मूर्ती तोडण्यात आल्या आहेत.

दरम्यान, सरकारी सूत्रांनी सांगितले की, ९ ऑक्टोबरपासून सुरू होणा-या दुर्गापूजेपूर्वी प्रत्येक मंडळाला प्रत्येकी ५ लाख रुपये जिझिया कर म्हणून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक समित्यांनी यावेळी दुर्गा पूजा आयोजित न करण्याचा निर्णय घेतला आहे.

बांगलादेशमधील मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील सरकार आणि मुस्लिम संघटनांनी हिंदूंना दुर्गा पूजा करण्याची परवानगी देण्यास नकार दिला आहे. देशामध्ये सुरक्षा व्यवस्था तितकीशी चांगली नाही. तसेच हल्ला होण्याचा धोका आहे, असे कारण परवानगी नाकारताना देण्यात आले आहे. दरम्यान, ज्या मंडळांना दुर्गापूजेची परवानगी मिळाली त्यांच्यावरही जाचक अटी लादण्यात आल्या आहेत. या मंडळांना नमाज सुरू असताना शांतता बाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत. म्हणजेच नमाज पठण सुरू असताना पूजा किंवा भजन करता येणार नाही.

आज सकाळीच किशोरगंज येथील बत्रिश गोपिनाथ जीउर आखाडा येथे दुर्गामातेची नवी मूर्ती तोडण्यात आली. तर कोमिला जिल्ह्यामध्येही दुर्गामातेची नवी मूर्ती तोडण्यात आली. तसेच मंदिरातील दानपेटीही चोरून नेण्यात आली. नारायण जिल्ह्यातील मीरापारा येथे दोन दिवसांपूर्वी कट्टरवाद्यांनी एका दुर्गा मंदिरावर हल्ला केल्याची घटना घडली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR