24.2 C
Latur
Tuesday, February 25, 2025
Homeमहाराष्ट्रआचारसंहिता काळात ३१.१६ कोटीची बेकायदा मालमत्ता जप्त

आचारसंहिता काळात ३१.१६ कोटीची बेकायदा मालमत्ता जप्त

मुंबई : विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक आचारसंहिता काळात निवडणूक आयोग अ‍ॅक्शन मोडवर असून सी-व्हिजील अ‍ॅपद्वारे प्राप्त ७७६ तक्रारींपैकी ७७३ तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. तसेच ३१ कोटी १६ लाखांची बेकायदा मालमत्ता जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी दिली आहे.

सजग नागरिकांना आचारसंहिता पालनासाठी सहकार्य करणारे सी-व्हिजिल अ‍ॅप हे कोणत्याही अ‍ॅपस्टोअरमधून डाऊनलोड करता येते. या अ‍ॅपद्वारे नागरिकांना आचारसंहिता भंगाबाबत तक्रार करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते. राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत एकूण ३१ कोटी १६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आचारसंहितेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु असल्याचेही डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR