पुणे : पुण्याच्या स्वारगेट बलात्कार प्रकरणी आरोपी दत्तात्रय गाडेला अटक करण्यात आली असून त्याला पुणे कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी दोन्ही बाजुची सुनावणी पार पडली व आरोपीला १२ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दोघांमध्ये संमतीने शारीरिक संबंध असल्याचा दावा बचाव पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे.
पिडीतेवर आरोपीने दोनवेळा बलात्कार केला. तसेच तिला आपण बसचा वाहक असल्याचे सांगीतले होते, अशी माहिती पोलिसांनी कोर्टात दिली असून १४ दिवसांची पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली होती. तसेच आरोपीवर ६ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
आरोपी दत्तात्रय गाडे फरार असताना त्याने शेतात आत्महत्या करण्याचा देखील प्रयत्न केला असल्याचे समजते. मात्र गळफास घेतलेला दोर तुटल्याने जीव वाचला. आत्महत्या करण्याचे साहित्य देखील घटनास्थळी सापडले आहेत. या संदर्भातील माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच ज्यांच्या मदतीने आरोपी मिळाला त्यांना १ लाखांचे बक्षीस देणार असल्याचे अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले आहे.