मुंबई : प्रतिनिधी
मुंबईतील कांदिवली येथील एका शाळेस बॉम्ब ठेवल्याचा ईमेल आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांचे बॉम्ब शोधक पथक शाळेत दाखल झाले असून विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आले आहे. पुढील शोध हा पोलिसांकडून घेतला जात आहे.
दरम्यान, मुंबईतील एका शाळेला बॉम्ब ठेवल्याचा ईमेल पाठवण्यात आलाय. या घटनेने मोठी खळबळ निर्माण झाली. मुंबईतील कांदिवली परिसरात ही शाळा आहे. धमकीच्या ईमेलची माहिती मिळताच शाळा प्रशासनाने याची माहिती पोलिसांनी दिलीये. गेल्या काही दिवसांपासून सतत असे धमकीचे मेल येताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच आरबीआयला देखील अशाप्रकारचा धमकीचा मेल आला होता.
शाळा प्रशासनाने पोलिसांना बॉम्ब ठेवल्याचा ईमेल आल्याची माहिती दिल्यानंतर पोलिसांचे बॉम्बशोधक पथक शाळेत दाखल झाले. विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना घरी पाठवण्यात आले. बॉम्बशोधक पथक तपास करत आहे. पोलिसांचे पथकही शाळेत दाखल झाले आहे. दिल्लीमध्येही एकाच वेळी अनेक शाळांना बॉम्बने उडवण्याचा धमकीचा ईमेल आला होता. यानंतर शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांना घरी पाठवून दिले.
बॉम्ब शोधक पथक, पोलिस दाखल
पोलिस देखील शाळांच्या बाहेर पोहोचले होते. आता थेट मुंबईतील शाळेला बॉम्बने उडवण्याचा धमकीचा मेल पाठवण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वीच मुंबईतीलच जोगेश्वरी येथील एका शाळेला बॉम्बने उडवण्याचा धमकीचा मेल पाठवण्यात आल्याचे सांगितले गेले होते.