22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeसोलापूरप्रिसीजन संगीत महोत्सवाचा सूरमयी प्रारंभ

प्रिसीजन संगीत महोत्सवाचा सूरमयी प्रारंभ

सोलापूर : प्रिसीजन फाउंडेशनच्यावतीने आयोजित प्रिसीजन संगीत महोत्सवाला प्रारंभ झाला, महोत्सवातील पहिल्या दिवसाची सुरवात अनुपम जोशी यांच्या सरोदवादनाने तसेच पंडित हरीश तिवारी यांच्या गायनाने सुरेल झाली. हुतात्मा स्मृती मंदिरात प्रिसीजनच्या प्रथेप्रमाणे महोत्सवाची सुरुवात झाली. दीपकळ्या फुलल्या आणि पाठोपाठ स्वरकळ्या फुलू लागल्या, वीररस व काहीशा गंभीर प्रकृतीच्या ‘श्री’ रागाचे स्वर श्रोत्यांच्या काळजाची पकड घ्यायला लागले. सोनिया मैहर घराण्याचे वादक अनुपम जोशी यांची बोटे सरोदवर फिरू लागली आणि कोमल रूषभ रसिकांच्या काळजात झिरपू लागला. अनुपम जोशी यांनी श्री रागात भावगहिरे आलाप जोड व झाला यांची पेशकष केली, मपनिसरे, निसारे,पनिसारे, परे, कोमल ऋषभ,चैत्रत व तीव्र मध्यमाच्या सुरावटीने ‘श्री’च्या संगतीने संगीत सांजवेळ सिक हृदयावर चढ़त गेली,

त्यानंतर त्यांनी बिहाग रागात मध्यलय गती सादर केल्या. पंढरपूर, तुळजापूर वअक्कलकोट आणि सिध्दरामेश्वर नगरीतील श्रोत्यांसाठी जोशी यांनी खास अभंगमाला सादर केली. कानडा हो विठ्ठलू, अबीर गुलाल उधळीत रंग खेळ मांडियेला वाळवंटी ठाई इत्यादी अभंगांची झलक सादर करून प्रथम सत्राची सांगता केली. त्यांना शंतनू देशमुख यांनी तबल्याची रंगतदार साथसंगत केली, तानपुरी या स्वरभोष वाद्यावर सुरेंद्र वैद्य यांनी साथसंगत केली. दुखण्या सत्रात पं. हरीश तिवारी यांनी यमनकल्याण राग सादर केला. त्यांच्या भौगरीनी स्वरांनी सभागृत भारून गेले. सुरुवातीला त्यांनी विलंबित अपतालात पियाबिन कैसे कटे रतिया बैरन ही बंदिश सादर केली.

पं. भीमसेन जोशी यांच्या वैशिष्टयपूर्ण स्वालगावाचा प्रभाव, संयमित सरगम, मंत्रात केलेली सुंदर कामगत, गमकेच्या जोरकस ताना, दमदार व तब्येतीने मांडणी यामुळे यमनकल्याण रंगत गेला. त्यानंतर राग यमनमध्ये द्रूत तीनतालात त्यांनी ‘सखी मेरी जाली पियाबिन ही जनप्रिय बंदिशी ढंगदार रीतीने सादर केली. दमदार ख्यालानंतर मिश्र काफीमध्ये पिया तो मानत नाही ही ठुमरी नजाकतदारपणे गायली. त्यानंतर त्यांच्या अभंग गायनाने श्रोत्यांना खिळवून ठेवले. अणुरेणुया थोकडा तुका आकाशाएवढा हा अभंग सादर केला. जो भजे हरी को सदा’ या भैरवीने त्यांनी सांगता केली. त्यांना संवादिनीवर सुयोग कुंडलकर यांनी तर हार्मोनियमवर सचिन कुंडलकर व तबल्यावर रोहित मुजूमदार यांनी साथसंगत केली.

प्रारंभी प्रिसीजनचे चेअरमन यतीन शहा, प्रिधीजनचे कार्यकारी संचालक करण शहा सोच संचालक रवींद्र जोशी, प्रिसीजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा, सरोद वादक अनुपम जोशी, शंतनू देशमुख यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. जनसंपर्क अधिकारी माधव देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. सरोद वाद्याबद्दल दिली माहिती सरोदवादक अनुपम जोशी यांनी यावेळी श्रोत्यांना सरोद वाद्याबद्दलची माहिती दिली. सरोद हे वाद्य एकाच लाकडापासून अखंड बनवले जाते. त्यांच्या सरोदला मैहर सरोद असे नाव आहे. २५ तारा असून वरती तांबा धातूचा तुचा असून पूर्वी तो भोपळ्याचा असायचा दांडीवर चमकदार धातूची पट्टी असून डाव्या हाताच्या बोटांनी स्वरवादन केले जाते. तर उजव्या हाताने नारळाच्या करवंटीच्या तुकड्याने वाजवले जाते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR