26.7 C
Latur
Friday, February 21, 2025
Homeहिंगोलीहिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे धक्के, हिंगोलीतील रामेश्वर तांडा हे भूकंपाचे केंद्र

हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे धक्के, हिंगोलीतील रामेश्वर तांडा हे भूकंपाचे केंद्र

रिस्टर स्केल 6.08 मी 4.5 व 6.19 मी. 3.6 ची नोंद

हिंगोली : २१ मार्च रोजी सकाळी 06:08:30 वाजता 4.5 रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची नोंद राष्ट्रीय भूकंप मापण यंत्रणेवर दिसुन आली. हिंगोली जिल्ह्य़ातील वसमत तालुक्यात असलेल्या कुरुंदा व दांडेगावच्या उत्तर भागातील रामेश्वर तांड्याच्या उत्तर भागात भूकंपाचे केंद्र असल्याचे दिसून आले. याची खोली 10 किलोमीटर असल्याचे दिसत आहे.

लगेचच दुसरा हलका धक्का पहिल्या धक्क्यानंतर अकरा मिनिटांनी म्हणजे सकाळी 06:19:05 वाजता 3.6 रिश्टर स्केल चा भूकंप झाल्याची नोंद राष्ट्रीय भूकंप मापण यंत्रणेवर दिसुन आली. मात्र या भूकंपाचे केंद्र तिन किलोमीटर दक्षिणेला असलेल्या कुरुंदा व दांडेगावच्या रामेश्वर तांड्याच्या दक्षिण भागात असल्याचे दिसून आले. याही भूकंपाची खोली 10 किलोमीटर असल्याचे दिसत आहे.

मराठवाड्यातील 1993 च्या भूकंपानंतरचा हा सर्वात मोठा आहे. यावेळेस हिंगोली नांदेड परभणी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी या भूकंपाचे धक्के बसल्याचे फोन आले.
श्रीनिवास औंधकर, संचालक,
एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र,
छत्रपती संभाजीनगर

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR