श्रीनगर : जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये सोमवारी भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर ऑफ सिस्मॉलॉजीनुसार, भूकंप दुपारी ३.४८ वाजता झाला आणि त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.५ मोजली गेली. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भूकंपामुळे जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंप दुपारी ३.४८ वाजता झाला आणि त्याचे केंद्र कारगिल होते. भूकंपाचा केंद्रबिंदू ३३.४१ अंश अक्षांश आणि ७६.७० अंश रेखांशावर पृष्ठभागापासून १० किलोमीटर खाली होता. यानंतर काश्मीरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले.
कारगिलमध्ये सोमवारी दुपारी भूकंपाचे धक्के जाणवले. अधिकाऱ्यांनी दुपारी ३.४८ वाजता ५.५ तीव्रतेचा भूकंप झाल्याची पुष्टी केली आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू १० किलोमीटर खोलीवर नोंदवला गेला. आतापर्यंत या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.