जालना : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ंिदडोरी लोकसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित खासदार व मंत्री छगन भुजबळ यांचे कट्टर विरोधक खा. भास्कर भगरे यांनी शुक्रवार दि. १९ जुलै रोजी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे.
यावेळी जरांगे व खा. भगरे यांच्यात एक तासभर चर्चा झाली. या वेळी खा. भगरे यांनी सांगितले की, मनोज जरांगे हे शनिवार दि. २० जुलै रोजी पुन्हा अंतरवाली सराटी येथे उपोषण करत आहे त्यांना पाठींबा देण्यासाठी येथे आलो आहे, मराठा समाजात आणेक गरीब विद्यार्थी आहे त्यांना शिक्षणाकरिता आरक्षणाची गरज आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष मनोज जरांगे यांच्या सोबत आहेत. जरांगे गेली १० महिण्यांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आंदोलन, उपोषण करत आहे. त्यांना पाठींबा देण्यासाठी अंतरवाली सराटी येथे येऊन जरांगे यांची भेट घेतली असल्याचे खा. भास्कर भगरे यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या सोबत माणिकराव शिंदे व कार्यकर्ते उपस्थित होते. खा. भगरे यांच्या भेटीमुळे चर्चेला उधान आले आहे. या आगोदर आमदार बच्चु कडू यांनी देखील मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे.