मुंबई : अक्षय कुमार हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता. अक्षयचा नवीन सिनेमा नुकताच रिलीज झाला. त्याचे नाव ‘सरफिरा’. यावर्षी अक्षय कुमारचा ‘बडे मिया छोटे मिया’ सिनेमा फ्लॉप ठरला. त्यानंतर अक्षयच्या ‘सरफिरा’कडे सर्वांचे लक्ष होते. ‘सरफिरा’ चांगली कमाई करेल असे वर्तवले जात होते. पण ‘सरफिरा’सुद्धा फ्लॉप होण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे सिनेमाच्या टीमने लोक सिनेमा पाहायला थिएटरकडे यावेत म्हणून तिकीटासोबत खास ऑफर ठेवली आहे.
अक्षय कुमारचा ‘सरफिरा’ सिनेमा शुक्रवार १२ जुलैला रिलीज झालाय. या सिनेमाची कमाई अनपेक्षितरित्या खूप कमी कमाई झाली. अक्षय कुमारच्या फ्लॉप सिनेमांची मालिका ‘सरफिरा’ मोडून काढेल असे वाटत होते. पण असे होताना दिसत नाही. त्यामुळे सिनेमाच्या टिमने प्रेक्षकांसाठी एक विशेष ऑफर ठेवली आहे. प्रसिद्ध मल्टिप्लेक्स चेन कठड ने प्रेक्षकांसाठी एक खास ऑफर जाहीर केली आहे. ऑफर अशी आहे की, प्रेक्षकांना तिकिटांसह एक चहा आणि दोन समोसे पूर्णपणे मोफत मिळतील. इतकंच नाही तर तुम्हाला ऑर्डरसोबत सिनेमाचे खास मर्चंडाईजही मोफत मिळणार आहे.
बॉक्स ऑफिसवर ‘सरफिरा’ची निराशाजनत कामगिरी दिसून आली. बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर पहिल्या दिवशी या सिनेमाने केवळ २.५० कोटी रुपयांची कमाई केली होती. दुस-या दिवशी कलेक्शनमध्ये थोडीशी सुधारणा दिसून आली आणि सिनेमाने ४.२५ कोटी रुपयांची कमाई केली. अशा प्रकारे सिनेमाने आतापर्यंत ६.७५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. आता या खास ऑफरचा ‘सरफिरा’ला फायदा होणार का? हे पाहणे औत्सुक्याचा विषय आहे.