26.4 C
Latur
Tuesday, February 25, 2025
Homeपरभणीखा. श्रीकांत शिंदेंनी घडवले श्रध्दा, सबुरीचे दर्शन

खा. श्रीकांत शिंदेंनी घडवले श्रध्दा, सबुरीचे दर्शन

पाथरी : पाथरी येथे आयोजित रोजगार महोत्सवानिमित्त सुरू असलेल्या सभेत खा.डॉ. श्रीकांत शिंदे बोलत असताना मराठा समाज बांधवांच्या वतीने प्रलंबित मराठा आरक्षणाकडे लक्ष वेधण्यासाठी काळ्याफिती दाखवण्यात आल्या. परंतू अचानक घडलेल्या प्रकाराने गोंधळून न जाता वडिलोपार्जित मिळालेल्या संस्काराचा आणि अष्टपैलू नेतृत्वाची कसब दाखवत उपस्थित मराठा समाज बांधवांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकारच आरक्षण देऊ शकते असा विश्वास निर्माण करत साईबाबांच्या नगरीत श्रद्धा आणि सबुरीचे दर्शन खा. शिंदे यांनी घडवले.

शिवसेनेचे अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष सईद खान यांच्या उत्कृष्ट नियोजनात पाथरीच्या जिल्हा परिषद मैदानावर हजारो लोकांच्या उपस्थितीत नोकरी महोत्सवाचे आयोजन तथा जाहीर सभा रविवारी पार पडली. यावेळी उपस्थितांना खा. शिंदे मार्गदर्शन करत असताना मराठा समाज बांधवांनी आरक्षण मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी काळ्या फिती दाखवल्या. परंतू खा. शिंदे यांनी राजकीय बळाचा कोणताही गैरवापर न करता मराठा आंदोलकांची आणि काळ्याफिती दाखवणा-या युवकांची समजूत काढत मराठा समाजाला आरक्षण फक्त आणि फक्त सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकार देऊ शकते असा विश्वास निर्माण केला. थोडेही विचलित न होता समय सूचकता व राजकीय कसब दाखवत मोठ्या जाहीर सभेला यशस्वी केल्यामुळे खा. शिंदे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सईद खान यांच्या वतीने साईबाबांची चांदीची मूर्ती भेट
औरंगाबाद येथे झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये सरकारच्या वतीने साईबाबा विकास आराखडा निधीसाठी भरीव निधी जाहीर केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानत खा. शिंदे यांना मौल्यवान अशी साईबाबांची चांदीची मूर्ती सप्रेम भेट म्हणून देण्यात आली.

उत्कृष्ट नियोजनासाठी सईद खान यांचे कौतुक
अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष सईद खान यांच्यासारखे हडामासाचे कार्यकर्ते पक्षात असणे ही शिवसेनेसाठी अभिमानाची बाब आहे. यामुळे पक्षाचा विस्तार झपाट्याने होतो. या मेहनतीचे फळ निश्चितच पक्ष त्यांना लवकरच देईल. भविष्यात त्यांनी संपूर्ण परभणी जिल्ह्याचे नेतृत्व करावे अशा शुभेच्छा देतो असे खा. श्रीकांत शिंदे म्हणाले. यामुळे जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR