24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयतस्करीमुळे अर्थव्यवस्थेचे नुकसान : निर्मला सीतारामन

तस्करीमुळे अर्थव्यवस्थेचे नुकसान : निर्मला सीतारामन

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी महसूल गुप्तचर विभागातर्फे सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या अंमलबजावणीतील सहकार्यावरील जागतिक परिषदेला संबोधित केले. यावेळी त्यांनी बेकायदेशीर व्यापारावर कारवाई करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याचे आवाहन केले आहे. त्या म्हणाल्या की, आंतरराष्ट्रीय स्तरावर तस्करी आणि इतर अवैध व्यापार थांबवण्यासाठी देशांना एकत्र येऊन सामूहिक पुढाकार घ्यावा लागेल. अवैध व्यापार आणि तस्करीमुळे अर्थव्यवस्थेचे नुकसान होत आहे. हे थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवावे लागेल आणि तस्करीमागील सूत्रधारांवर कारवाई करावी लागेल, असे त्या म्हणाल्या.

निर्मला सीतारामन म्हणाल्या की, बेकायदेशीर व्यापार ही एक मोठी आंतरराष्ट्रीय समस्या बनली आहे आणि जोपर्यंत सर्व देशांनी त्याला कठोरपणे सामोरे जाण्यासाठी सामूहिक पुढाकार घेतला नाही तोपर्यंत त्याला रोखणे शक्य होणार नाही. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, कायदेशीर उपक्रमांसोबतच देशांना कृतीयोग्य माहितीही एकमेकांसोबत शेअर करावी लागेल. यावेळी त्यांनी ‘सेशाचलम’ जंगलातील रेड सँडर्स (लाल चंदन) लाकडाच्या अवैध व्यापाराला आळा घालण्यासाठी केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाच्या नवीन मोहिमेची घोषणा केली. सीतारामन म्हणाल्या की, सीबीआयसीचे ऑपरेशन एसईएसएचए फेज-४ लाँच करताना मला आनंद होत आहे. शेषाचलम म्हणजे एका पवित्र टेकडीचा संदर्भ आहे, जिथे लाल चंदनाची तस्करी केली जाते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR